पवारांवर लिहलेली अश्लील पोस्ट पोलीस पाटलाला भोवली, अशी झाली कारवाई

पोलीस पाटलाने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर शेअर केला होता.

पोलीस पाटलाने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर शेअर केला होता.

  • Share this:
चांदवड, 20 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अश्लील भाषेत सोशल मीडियावर केलेली टीका एका पोलीस पाटलाला चांगलीच भोवली आहे. चांदवड तालुक्यातील देवरगाव पोलीस पाटील आणि ग्रुपच्या अॅडमीनवर चांदवडच्या वडणेर पोलिसांनी केला गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माणिक संपत शिंदे असं या पोलीस पाटलाचं नाव असून त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर शेअर केला होता. हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. यानंतर पोलीस पाटील माणिक सपंत शिंदे सह ग्रुप अॅडमिन कमलाकर शिंदेवर भा.द वी 500, 504, 505(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे असा प्रकार घडला असताना दुसरीकडे पंढरपूर जिल्ह्यात एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. खरंतर, शरद पवार वयाच्या 81 व्या वर्षीय कुणालाही लाजवेल असा पद्धतीने काम करत आहे. पंढरपूरमध्ये काल शरद पवारांचे वेगळे रुप पाहण्यास मिळाले. आपल्या एका '87 वर्षांच्या' तरुण कार्यकर्त्यासाठी पवारांनी गाडीचा ताफा थांबवला आणि विचारपूस केली. महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक चढउतार पाहिलेच पण अनेक मुख्यमंत्री आणि सरकारही पाहिली. आता त्यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. राज्यात सध्या कोरोनाची परिस्थिती बिकट आहे. पण, अशाही परिस्थितीत शरद पवार हे जिल्ह्यांचे दौरे करत आहे. काल शरद पवार हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पंढरपूर तालुक्यातील बाजीरावची विहीर येथे शेळवे गावालगत शरद पवारांचा भरधाव जाणारा ताफा अचानक थांबला. शरद पवारांचा ताफा थांबवण्याचे कारणही तसेच होते. शेळवे गावात राहणारे 87 वर्षांचे पांडुरंग गाजरे हे शरद पवारांना खूप प्रेम करतात. ज्या ज्या वेळी शरद पवार हे पंढरपूरच्या दौऱ्यावर येतात तेव्हा आवर्जून गाजरे यांची भेट घेत असतात.
Published by:Renuka Dhaybar
First published: