पुणे, 17 फेब्रुवारी : गेले काही दिवस पुण्यातील कोरोना (Pune coronavirus) रुग्णांची आकडेवारी कमी झाली होती. पुणेकरांनी कोरोनावर नियंत्रण मिळवल्याचं चित्र होतं. कोरोना रुग्णांची कमी होणारी ही संख्या पाहून पुणेकरांनादेखील दिलासा मिळाला. पण हा दिलासा तात्पुरताच होता. कारण आता पुण्यात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे पुणेकरांना आता अधिक सावध राहण्याची गरज आहे. पुण्यातील रुग्णसंख्या लक्षणीयरित्या कमी झाली होती. पण आता मात्र पुण्याचा धोका पुन्हा वाढू लागला आहे. पुण्यात कोरोनाने आपले नवे हॉटस्पॉट तयार केले आहेत. जुन्या हॉटस्पॉटमधील रुग्णांची संख्या कमी झाली आहे, पण या नव्या हॉटस्पॉटमध्ये झपाट्यानं रुग्ण वाढत आहेत. सिंहगड परिसरात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. पुण्यातील कोरोनाचे नवे हॉटस्पॉट सिंहगड परिसर - 44 रुग्ण बिबवेवाडी - 39 रुग्ण नगररोड - वडगाव शेरी - 37 रुग्ण वारजे - कर्वेनगर - 36 रुग्ण हडपसर- मुंढवा - 33 रुग्ण कोथरूड - बावधन - 27 रुग्ण ढोले पाटील रोड - 11 रुग्ण हे वाचा - मुंबईकरांनो, लग्न सोहळ्यात कोरोनाचे नियम मोडले तर होईल गुन्हा दाखल त्यामुळे पुणेकरांनी या ठिकाणी जाणं टाळायला हवं. शिवाय घराबाहेर पडताना आवश्यक ती खबरदारीदेखील घ्यायला हवी. कोरोना नियमांचं पालन करा. मास्क घाला आणि सोशल डिस्टन्सिंगही ठेवा. जेणेकरून कोरोनाचा धोका टाळता येईल आणि पुन्हा डोकं वर काढणाऱ्या कोरोनाला थोपवता येईल. मंगळवारच्या आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्याची काय परिस्थिती आहे पाहुयात. कोरोना बाधित रुग्णांची संख्या 393231 बरे झालेले रुग्ण - 279453 उपचार सुरू असलेले रुग्ण - 4726 मृत्यू - 9052 मृत्यूचं प्रमाण - 2.30 रुग्ण बरे होण्याचं प्रमाण - 96.50 राज्यात काय आहे स्थिती? मंगळवारच्या आकडेवारीनुसार राज्यात 3 हजार 663 नवीन रुग्णांचे निदान झालं आहे, तर 2 हजार 700 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 19 लाख 81 हजार 408 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.66 टक्के एवढे झालं आहे. हे वाचा - पार्टी आली अंगलट! एकाच अपार्टमेंटमधील 103 जणं कोरोना पॉझिटिव्ह राज्यात 39 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.49 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,53,96,444 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 20,71,306 (13.45टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात एकूण 37 हजार 125 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.