बेंगळुरू, 17 फेब्रुवारी: सध्या कोरोनाची (Coronavirus) परिस्थीत पुन्हा एकदा बिघडण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातून एकापाठोपाठ (Corona Update from Maharashtra) एक बातम्या समोर येत असताना कर्नाटकमधून कोरोनाबाबतीत (Coronavirus in Karnataka) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एकाच अपार्टमेंटमधील 103 जणं कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळून आले आहे. बेंगळुरू (Bengaluru) याठिकाणची ही घटना आहे. काही दिवसांपूर्वी बेंगळुरूतील या कॉम्प्लेक्समध्ये पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर करण्यात आलेल्या कोरोना चाचणीमध्ये 103 जण पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं आहे. यामध्ये वृद्धांची संख्या अधिक असल्याचीही माहिती समोर येते आहे. बेंगळुरूतील बोम्मनाहल्ली परिसरातील लेकव्ह्यू या अपार्टमेंटमध्ये 103 रुग्ण सापडल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
103 people at SNN Raj Lakeview apartment in Bommanahalli, Bengaluru tested positive for #COVID19. They had organised a program at the apartment and tested positive in the COVID test they underwent later. 96 of the 103 people are above the age of 60: BBMP Commissioner#Karnataka
— ANI (@ANI) February 17, 2021
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार 103 पैकी 96 व्यक्ती या ज्येष्ठ नागरिक आहेत. BBMP कमिशनर यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे चिंतेचं कारण जास्त आहे. बेंगळुरू महानगरपालिकेचे (BBMP) आयुक्त एन मंजुनाथ प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार या अपार्टमेंटमध्ये एकूण 1052 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यापैकी 103 जणं कोरोना पॉझिटिव्ह आहेत. यापैकी एकाला रुग्णालयात भरती करण्यात आलं असून इतर सर्वांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. दरम्यान आयुक्तांच्या माहितीनुसार BBMP कडून या रुग्णांचे सॅम्पल्स नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थकडे आणि NIMHANS कडे पाठवण्यात आले आहेत. जेणेकरून व्हायरसचा व्हॅरिएंट ओळखला जाईल. (हे वाचा- CORONA VACCINE च्या 2 डोसनं केली कमाल; 94 टक्के कमी झाली देशातील कोरोना प्रकरणं ) काही दिवसांपूर्वी या अपार्टमेंटमधील रहिवासी देहरादूनला जाण्यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले, 10 फेब्रुवारी रोजी त्यांनी BBMP ला याबाबत माहिती दिली आणि त्यानंतर सर्वांची कोरोना चाचणी घेण्यात आली, अशी माहिती BBMP अधिकाऱ्यांकडून मिळते आहे. दिलासादायक बाब म्हणजे या सर्वांमध्ये लक्षणे नाही आहेत. तरी देखील आरोग्य खात्याच्या प्रोटोकॉलनुसार खबरदारीचा उपाय म्हणून याठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे.
बेंगळुरूतून समोर आलेली आणखी एक धक्कादायक अपडेट म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी मंजुश्री नर्सिंग कॉलेजमधील 210 विद्यार्थ्यांपैकी 40 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. BBMP कमिशनर एन मंजुनाथ प्रसाद यांनी याबाबत माहिती दिली आहे.