मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

धक्कादायक! पुण्यात मृतांचा आकडा 46 वर, ससून हॉस्पिटलमध्ये आणखी दोघांचा मृत्यू

धक्कादायक! पुण्यात मृतांचा आकडा 46 वर, ससून हॉस्पिटलमध्ये आणखी दोघांचा मृत्यू

एकट्या ससूनमध्ये आतापर्यंत 30 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर ससूनमधील कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी डॉक्टरांचा टास्कफोर्स करण्यात आला आहे.

पुणे, 16 एप्रिल: पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर मृतांचा आकडा देखील वाढत आहे. ससून हॉस्पिटलमध्ये गुरुवारी आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आहे. पुणे शहरातील मृतांचा आकडा आता 46 वर पोहोचला आहे. दोन्हा मृत नागरिक गंजपेठ आणि कोंढवा भागातले रहिवासी होते.

एकट्या ससूनमध्ये आतापर्यंत 30 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर ससूनमधील कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी डॉक्टरांचा टास्कफोर्स करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काळात पुण्यातील कोरोनाबाधितांचा मृत्यूदर कमी करण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.

हेही वाचा..चक्क स्वर्गरथ घेऊन रस्त्यावर उतरले यमराज, म्हणाले मास्क लावा..घरातच थांबा!

दुसरीकडे, ससून हॉस्पिटलमधील आणखी एका डॉक्टरमध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागली आहेत. त्यानंतर आता तीन नर्ससहित डॉक्टरांनाही आयसोलेट करण्यात आलं आहे. याआधीच ससूनमधील तीन नर्स पॉजिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली होती.

भवानी पेठ हॉटस्पॉट...

भवानीपेठेतील पालिकेचं सोनवणे रूग्णालयही सील बंद करण्यात आलं आहे. कोरोनाच्या विळख्यात सापडलेले डॉक्टर आणि नर्स कोरोना रूग्णाच्या संपर्कात आले होते, अशी माहिती आहे. पुण्यात सर्वाधिक 85 पेशंट भवानी पेठेत आढळले आहेत.

हेही वाचा..लॉकडाऊनमध्ये राज्यातील उद्योग सुरू होणार, उद्योगमंत्र्यांची मोठी घोषणा

दरम्यान, पुण्यातील 16 पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आणखी 28 परिसर सील करण्यात आले. यामध्ये पुणे शहरातील जवळपास प्रत्येक भागातील अशा परिसरांचा समावेश आहे जिथे लोक अजूनही बाहेर फिरताना दिसत आहेत. पुण्यात याआधीच चार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पाच परिसर सील करण्यात आले आहेत. आता आणखी 28 परिसर सील करण्यात आल्यामुळे लॉकडाऊन आणखी कडक होणार आहे. वानवडी, हडपसर, मुंढवा आणि कोंढवा या पोलीस परिमंडळातील आणखी परिसर सील करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्याचा आता मोठा भाग सील झाला आहे.

नुकतंच महापालिका आयुक्तांनी पुण्यातील काही परिसर सील करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी आणि पोलिसांकडे दिला होता. मात्र महापालिका आयुक्तांनी दिलेल्या प्रस्तावामधे आणखी काही परिसरांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

संपादन- संदीप पारोळेकर

First published:

Tags: Corona, Pune news