- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
Choose your district
होम » फोटो गॅलरी
चक्क स्वर्गरथ घेऊन रस्त्यावर उतरले यमराज, म्हणाले मास्क लावा..घरातच थांबा!
कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून देशभरात लॉकडाऊन आहे. संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. मात्र अद्यापही काही नागरिक गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत. लोक रस्त्यावर विनाकरण फिरताना दिसत आहेत. अशा नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी नशिराबाद (जि.जळगाव) ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी अनोखी शक्कल लढवली आहे.
1/ 4


ग्रामपंचायत कार्यालयापासून गावातील प्रमुख रस्त्यावर स्वर्गरथ फिरवत कर्मचाऱ्यांनी कोरोनाबाबत जनजागृती संचलन केले.
2/ 4


कोरोना रोगाला हद्दपार करण्यासाठी सर्वांनी घरातच थांबा. सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करा. मास्क लावा, रुमालाचा वापर करा, अशा विविध घोषणा देत यावेळी नागरिकांना देण्यात आल्या.
3/ 4


लॉकडाऊनचे नियम न पाळल्यास उद्भवणाऱ्या समस्यांबाबत यमाच्या वेशात कर्मचाऱ्यांनी भावनिक साद घातली. तर कोरोणााला हद्दपार करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही केले.