राज्याची ही परिस्थिती साहजिकच धोकादायक होती. यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये चिंताजनक संख्या समोर येत होती. पण राज्यातील दोन सर्वात महत्त्वाच्या शहरांनी प्रशासनाची धडधड वाढवली. मुंबई आणि पुणे. पुण्यामध्ये तर कोरोना रुग्णसंख्या रोज नवनवे उच्चांक गाठत होती. आरोग्य व्यवस्था जणू कोलमडून पडणार का असं वाटत असतानाच प्रशासनानं उपाययोजनांचा वेग अधिक वाढवला. त्याचा परिणाम समोर आला आणि पुण्यानं त्याच वेगानं पुन्हा रुळावर येत आता परिस्थितीवर जवळपास पूर्ण नियंत्रण मिळवलं आहे. (वाचा-जागोजागी पैसेच पैसे! 30 वर्षांपासून भीक मागणाऱ्या महिलेच्या झोपडीत लाखोंचं घबाड) पुणे शहराचा कोरोनाच्या रुग्णांचा रिकव्हरी रेट हा शुक्रवारी 97.15 टक्क्यांवर पोहोचल्याचं समोर आलं आहे. राज्यातच नव्हे तर देशात हा सर्वाधिक रिकव्हरी रेट आहे. परिणामी रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग हा 899 दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. पुण्यानं केलेल्या उपययोजनांमध्ये लसीकरणाचा मोठा वाटा होता. पुण्यात लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी मोठे प्रयत्न झाले. त्यामुळंदेखिल परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आलं आतापर्यंत पुण्यात 11 लाख 22 हजार 811 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. पुणे शहरामधली रुग्णसंख्या घटल्यानं कंटेन्मेंट झोनमध्येदेखिल मोठी घट झाली आहे. शहरात फक्त 28 कंटेन्मेंट झोन असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळं पुण्यातली संपूर्ण राज्याच्या चिंता वाढवलेल्या पुण्यानं कोरोनावर मात करण्याच्या शर्यतीतही आघाडी घेतली आहे. आता सर्व पुणेकरांनी काळजी घेऊन ही स्थिती कायम ठेवणं गरजेचं आहे.तिसरी लाट आणि त्या पार्श्वभूमीवर तयारी !#PuneFightsCorona #PMCFightsCorona#पुण्याचा_निर्धार_कोरोना_हद्दपार pic.twitter.com/dcAcKtqLaf
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 3, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Pune, Pune news