मराठी बातम्या /बातम्या /देश /जागोजागी पैसेच पैसे! 30 वर्षांपासून भीक मागणाऱ्या महिलेच्या झोपडीत सापडले लाखोंचं घबाड

जागोजागी पैसेच पैसे! 30 वर्षांपासून भीक मागणाऱ्या महिलेच्या झोपडीत सापडले लाखोंचं घबाड

अनेकदा भीक मागत असलेल्या व्यक्तीकडे किती पैसे असतील याचा अंदाज लोकांना येत नाही.

अनेकदा भीक मागत असलेल्या व्यक्तीकडे किती पैसे असतील याचा अंदाज लोकांना येत नाही.

अनेकदा भीक मागत असलेल्या व्यक्तीकडे किती पैसे असतील याचा अंदाज लोकांना येत नाही.

श्रीनगर, 4 जून: सामान्यतः भीक (Beggar) मागत असलेल्या व्यक्तीला लोकं पैसे आणि अन्य काही आवश्यक वस्तू देतात. परंतु, भीक मागत असलेल्या व्यक्तीकडे किती पैसे असतील याचा अंदाज लोकांना येत नाही. भीक मागणाऱ्यांकडे लाखो रुपये सापडल्याच्या किंवा एक किंवा अनेक बॅंक खात्यांमध्ये पैसे मिळून आल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. पुरेसे पैसे मिळाल्यानंतरही असे लोक भीक का मागतात याची कारणे अद्यापही अस्पष्टच आहेत. अनेकदा यामागे अपेक्षित रोजगाराची कमतरता, अपंगत्व, वयामुळे काम करण्याच्या क्षमतेवर झालेला परिणाम, निराधार असणं आदी कारणे असू शकतात. यासाठी सरकारने पुढाकार घेत भीक मागणाऱ्या व्यक्तींकरिता ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. तसेच या व्यक्तीचे योग्य ते पुर्नवसन करणे देखील आवश्यक आहे. जेणेकरुन त्यांच्यावर भीक मागून चरितार्थ चालवण्याची वेळ येणार नाही.

नुकत्याच घडलेल्या एका घटनेत असं लक्षात आलं की जम्मूतील राजौरी (Rajouri) येथील एक वयोवृध्द महिला भीक मागून आपला चरितार्थ चालवत होती. मात्र प्रशासनाने केलेल्या तपासणीत तिच्या झोपडीवजा घरामध्ये लाखो रुपयांचे घबाड सापडले आहे. ही रक्कम प्रशासनाने ताब्यात घेतली असून या महिलेला वृध्दाश्रमात (Old Age Home) दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा-एक विवाह असाही : मांडवातच वधूचा मृत्यू, धक्क्यातून सावरत लहान बहिणीशी केलं लग्न

जम्मूतील राजौरी येथील एक वयोवृध्द महिला भीक मागत होती. मात्र तिच्या झोपडीवजा घरातून प्रशासनाने 2 लाख 60 हजार रुपये जप्त केले आहेत. ही 70 वर्षीय महिला गेल्या 30 वर्षांपासून भीक मागून आपली गुजराण करीत आहे. ती दररोज राजौरीतील नौशहरा वॉर्ड क्रमांक 9 मध्ये भीक मागत असे. लोक तिला मदत म्हणून पैसे आणि गरजेच्या वस्तू देत असत. ती रस्त्याच्या कडेला झोपडीत राहत होती.

प्रशासनाने नुकतेच निराधार व्यक्तींकरिता एका योजनेवर काम सुरु केलं आहे. या योजनेअंतर्गत निराधार व्यक्तींना शेल्टर होममध्ये किंवा वृध्दाश्रमात दाखल केलं जात आहे. सोमवारी काही लोकांनी या महिलेला वृध्दाश्रमात दाखल केलं. त्यानंतर प्रशासनाने मंगळवारी सकाळपासून झोपडी हटवण्याचं काम सुरु केलं. जेव्हा नगरपालिकेचे कर्मचारी झोपडीत सफाई करु लागले तेव्हा त्यांना जागोजागी पैसे आढळून आले. तसेच या कर्मचाऱ्यांना पैशाने भरलेले डबे देखील सापडले. अंथरुणाखालीही पैसे ठेवले असल्याचे आढळून आले. आता प्रशासनाने हे पैसे कोशागारात भरले आहेत. काही दिवसांनंतर हे पैसे या वृध्द महिलेला परत केले जाणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

First published:
top videos

    Tags: Jammu and kashmir, Money