मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /'आमच्याकडे नाही, अमेरिकेतच शोधा', कोरोनाच्या उगमावरून चीनच्या उलट्या बोंबा

'आमच्याकडे नाही, अमेरिकेतच शोधा', कोरोनाच्या उगमावरून चीनच्या उलट्या बोंबा

कोरोनाव्हायरस वुहान लॅबमधूनच (Wuhan lab) आल्याचा अमेरिकेतील संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊची (Dr. Anthony Fauci) यांचा ई-मेल समोर आल्यानंतर चीनने अमेरिकेवर पलटवार केला आहे.

कोरोनाव्हायरस वुहान लॅबमधूनच (Wuhan lab) आल्याचा अमेरिकेतील संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊची (Dr. Anthony Fauci) यांचा ई-मेल समोर आल्यानंतर चीनने अमेरिकेवर पलटवार केला आहे.

कोरोनाव्हायरस वुहान लॅबमधूनच (Wuhan lab) आल्याचा अमेरिकेतील संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊची (Dr. Anthony Fauci) यांचा ई-मेल समोर आल्यानंतर चीनने अमेरिकेवर पलटवार केला आहे.

बीजिंग, 04 जून: कोरोनाव्हायरस (Coronavirus) सर्वात आधी कुठे सापडला, हे अद्यापही अनुत्तरितच आहे. हा व्हायरस चीनच्या वुहान लॅबमधून (China wuhan lab) पसरला असा आतापर्यंत दावा केला जात होता. जागतिक आरोग्य संघटनेनंही (WHO) वुहान लॅबमध्ये जाऊन तपासणी केली. त्यानंतर लॅबमधून व्हायरस पसरल्याची शक्यता डब्लूएचएनेसुद्धा नाकारली. दरम्यान अमेरिकेला मात्र अद्यापही हा व्हायरसच्या चीनच्या लॅबमधूनच पसरल्याचा संशय आहे. आता अमेरिकेतील संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊची (Dr. Anthony Fauci) यांचा याबाबतचा ई-मेल समोर आल्यानंतर या चर्चेला पुन्हा उधाण आलं आहे. यावर चीननेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

डॉ. फाऊची आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोरोना हा वुहानच्या लॅबमधून लिक झाला असावा, असं मानलं आहे. फाऊची यांनी याबाबत चीनला एक ई-मेलही केला होता. फ्रिडम ऑफ  इन्फॉर्मेशन एक्टअंतर्गत वॉशिंग्टन पोस्ट, बज़फीड न्यूज़ आणि सीएनएनने जानेवारी ते जून  2020 पर्यंतचा 3000 पानांचं हा ई-मेल मिळवला आहे. ज्यात त्यांनी चीनकडून याबाबत माहिती मागवली होती.

हे वाचा - भारतात कोरोना विषाणूची दुसरी लाट पसरण्यामागं 'हे' होतं महत्त्वाचं कारण - WHO

नोव्हेंबर 2019 मध्ये आजारी पडलेल्या त्या नऊ लोकांबाबत माहिती द्या, त्यांचा वैद्यकीय रेकॉर्ड मला पाहायचा आहे. ते खरंच आजारी पडले होते का आणि त्यांना काय झालं होतं, असं फॉसी यांनी या ई-मेल म्हटलं होतं. हा ई-मेल आता सार्वजनिक झाला आहे.

दरम्यान या ई-मेलवर चीनने प्रतिक्रिया दिली आहे. 30, डिसेंबर 2019 मध्ये कोरोनाव्हायरसशी संपर्क आला नाही असं वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने स्पष्ट केलं आहे, असं उत्तर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलं आहे.

हे वाचा - आयुर्वेदिक उपचार देताना एकही कोरोना बळी नाही; केंद्रीय रुग्णालयाचा मोठा दावा

यूएसने व्हायरसची निर्मिती कुठून झाली याचा अभ्यास  करण्यासाठी अमेरिकेने त्यांच्या देशात जागतिक आरोग्य संघटनेला बोलवावं. फोर्ट डेट्रिक लॅबसह जगातील त्यांच्या 200 पेक्षा जास्त बायो लॅबबाबतही माहिती द्यावी, असं चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेनबिन यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Coronavirus