मराठी बातम्या /बातम्या /पुणे /pune by-poll election : मतदानाच्या दिवशीही राडा, भाजप आणि कलाटे समर्थकामध्ये मारामारी, VIDEO

pune by-poll election : मतदानाच्या दिवशीही राडा, भाजप आणि कलाटे समर्थकामध्ये मारामारी, VIDEO

 मात्र बंदोबस्तासाठी असलेले पोलिसांनी मध्यस्थ केली आणि पुढील अनर्थ टळला.

मात्र बंदोबस्तासाठी असलेले पोलिसांनी मध्यस्थ केली आणि पुढील अनर्थ टळला.

मात्र बंदोबस्तासाठी असलेले पोलिसांनी मध्यस्थ केली आणि पुढील अनर्थ टळला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

चिंचवड, 26 फेब्रुवारी : पुण्यात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. पण चिंचवडमध्ये अपक्ष उमेदवार राहुल कलाटे समर्थक गणेश जगताप आणि भाजपचे माजी नगरसेवक सागर अंघोळकर यांच्यात मारामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

चिंचवड मतदारसंघातील सांगवी परिसरात असलेल्या मतदान केंद्रावर हा प्रकार थोड्या वेळापूर्वी घडला. शंभर मीटरच्या आत भाजपचे समर्थक का थांबले असा जाब गणेश जगताप यांनी विचारल्यानंतर या वादाला सुरुवात झाली आणि दोघेही भिडले. मात्र बंदोबस्तासाठी असलेले पोलिसांनी मध्यस्थ केली आणि पुढील अनर्थ टळला.

दरम्यान, संबंधित प्रकाराबाबत तक्रार आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल आणि शहरात सुरळीत मतदान सुरू असल्याचा दावा पोलीस आयुक्त काकासाहेब डोळे यांनी केला.

(चुकीला माफी नाही! अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या भावाचा शिंदे गटात प्रवेश)

तर, भाजप पहिल्या दिवसापासून आपल्या कार्यकर्त्यांना दमदाटी करत आहे धमकावत आहे, असा आरोप अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी केला. घडलेला प्रकार निंदणीय आहे. मात्र त्याचा मतदानावर परिणाम होऊ नये म्हणून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना आपण शांततेचा आव्हान करत असल्याचं कलाटे म्हणाले.

शंकर जगताप आणि  नाना काटे यांची गळाभेट

दरम्यान, राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कायमचा मित्रही नसतो याचाच प्रत्यय चिंचवड मतदारसंघात आला. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे हे समारोसमोर आले आणि त्यानंतर जे घडलं ते त्यांच्या कार्यकर्त्यांनी अपेक्षित नसेल.

(pune by-poll election : मतदानासाठी पैसे घेतले नाही, भाजपच्या माजी नगरसेवकाने केली मारहाण)

दोघांनीही एकमेकांची गळा भेट घेत, हस्तांदोलन केलं आणि एकमेकांना निवडून येण्याच्या शुभेच्छाही दिल्या. आपल्या नेत्यांनी आपल्याला दिलेली शिकवण आपण स्मरणात ठेवली आहे. राजकारणापलीकडे मैत्री जपण्याचा प्रयत्न करत असल्याचं दोघेही म्हणाले.

First published:
top videos