मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Pune: गाडीला कट मारल्याने झाला वाद, बेदम मारहाण झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

Pune: गाडीला कट मारल्याने झाला वाद, बेदम मारहाण झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

Bike rider beaten to death: किरकोळ वादानंतर करण्यात आलेल्या मारहाणीत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Bike rider beaten to death: किरकोळ वादानंतर करण्यात आलेल्या मारहाणीत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Bike rider beaten to death: किरकोळ वादानंतर करण्यात आलेल्या मारहाणीत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

  • Published by:  Sunil Desale

पुणे, 14 ऑक्टोबर : गाडीला ओव्हरटेक करणं किंवा कट मारल्याच्या कारणावरुन अनेकदा वाहन चालकांमध्ये वाद होत असतात. असाच काहीसा प्रकार पुण्यात घडला आहे. मात्र, या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं आणि त्यात एका दुचाकीस्वाराला आपले प्राण गमवावे (bike rider beaten) लागले आहेत. पुण्यातील उरुळी कांचन (Uruli Kanchan Pune) परिसरात ही घटना घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 23 वर्षीय अक्षय टिळेकर (Akshay Tilekar) हा तरुण आपल्या दुचाकीवरुन जात होता. बुधवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास अक्षयच्या दुचाकीचा एका फोर व्हीलर गाडीला धक्का लागला. या मुद्द्यावरुन कारमधील चौघांनी अक्षयसोबत वाद घालण्यास सुरुवात केली.

हा वाद इतका विकोला गेला की, कारमधील चौघांनी मिळून अक्षयला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत अक्षय बेशुद्ध झाला. या घटनेनंतर अक्षयला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच अक्षयचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यावर लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

बदलापुरात सुनेवर वार करुन सासऱ्याने पेटवलं घर

कौटुंबिक वाद विकोपाला गेला आणि सासऱ्याने सुनेवर वार केल्याची घटना समोर आली आहे. बदलापूर पश्चिम परिसरातील शनी नगर येथे ही घटना घडली आहे. सुनेवर हल्ला केल्यानंतर सासऱ्याने घर पेटवून दिलं. या घटनेने संपूर्ण बदलापुरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, किसन जाधव हे बदलापुरात आपला मुलगा, सुन आणि दोन नातवंडांसोबत राहत होते. बुधवारी दुपारच्या सुमारास किसन जाधव यांचा सुनेसोबत वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, किसन जाधव यांनी थेट सुनेवर हल्ला केला. घटनेच्यावेळी किसन जाधव यांचा मुलगा कामावर गेला होता तर दोन्ही नातवंड ही घराबाहेर खेळायला गेली होती.

किसन जाधव यांनी सुनेवर हल्ला केला असता तिने आरडा-ओरड करण्यास सुरुवात केली. तिचा आवाज ऐकून शेजारी त्यांच्या घरात दाखल झाले. किसन जाधव यांनी केलेल्या हल्ल्यात सुन गंभीर जखमी झाली होती. शेजाऱ्यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर किसन जाधव यांनी घराचा दरवाचा आतून लावला आणि घर पेटवून दिले. तसेच घरातच गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. किसन जाधव यांच्या घरातून जळण्याचा वास आणि धूर येत असल्याचं शेजाऱ्यांनी पाहिलं आणि त्यांनी दरवाजा ठोठावला. मात्र, दरवाजा आतून बंद होता आणि उघडला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांनी अग्निशमन दलाला कळवलं.

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी किसन जाधव हे घरात होरपळलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

First published:

Tags: Accident, Death, Pune