• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Badlapur Crime: सुनेवर वार करुन सासऱ्याने पेटवलं घर, मग गळफास घेत केली आत्महत्या

Badlapur Crime: सुनेवर वार करुन सासऱ्याने पेटवलं घर, मग गळफास घेत केली आत्महत्या

सुनेच्या डोक्यात वार करुन सासऱ्याने पेटवलं घर, मग गळफास घेत केला आयुष्याचा शेवट

सुनेच्या डोक्यात वार करुन सासऱ्याने पेटवलं घर, मग गळफास घेत केला आयुष्याचा शेवट

Badlapur Crime News: कौटुंबिक वादातून सासऱ्याने सुनेवर हल्ला करुन मग स्वत: आत्महत्या केल्याची घटना बदलापुरात घडली आहे.

 • Share this:
  बदलापूर, 14 ऑक्टोबर : कौटुंबिक वाद विकोपाला गेला आणि सासऱ्याने सुनेवर वार केल्याची घटना समोर आली आहे. बदलापूर पश्चिम (Badlapur west) परिसरातील शनी नगर येथे ही घटना घडली आहे. सुनेवर हल्ला (attack on daughter in law) केल्यानंतर सासऱ्याने घर पेटवून दिलं. या घटनेने संपूर्ण बदलापुरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, किसन जाधव हे बदलापुरात आपला मुलगा, सुन आणि दोन नातवंडांसोबत राहत होते. बुधवारी दुपारच्या सुमारास किसन जाधव यांचा सुनेसोबत वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, किसन जाधव यांनी थेट सुनेवर हल्ला केला. घटनेच्यावेळी किसन जाधव यांचा मुलगा कामावर गेला होता तर दोन्ही नातवंड ही घराबाहेर खेळायला गेली होती. किसन जाधव यांनी सुनेवर हल्ला केला असता तिने आरडा-ओरड करण्यास सुरुवात केली. तिचा आवाज ऐकून शेजारी त्यांच्या घरात दाखल झाले. किसन जाधव यांनी केलेल्या हल्ल्यात सुन गंभीर जखमी झाली होती. शेजाऱ्यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. वाचा : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातला साक्षीदार किरण गोसावी फरार?, पुणे पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी या घटनेनंतर किसन जाधव यांनी घराचा दरवाचा आतून लावला आणि घर पेटवून दिले. तसेच घरातच गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. किसन जाधव यांच्या घरातून जळण्याचा वास आणि धूर येत असल्याचं शेजाऱ्यांनी पाहिलं आणि त्यांनी दरवाजा ठोठावला. मात्र, दरवाजा आतून बंद होता आणि उघडला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांनी अग्निशमन दलाला कळवलं. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी किसन जाधव हे घरात होरपळलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. किसन जाधव यांच्या सुनेवर बदलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान संपत्तीच्या वादातून किसन जाधव यांनी सुनेवर हल्ला केला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी बदलापूर पोलीस अधिक तपास करत आहेत. रशियात दोन बाळांना सोबत घेत आईची आत्महत्या अतिशय उंचावरुन खाली पाहिल्यास अनेकांना चक्कर येते. मात्र, रशियामधील एक महिला डिप्रेशनमुळे इतकी हताश झाली होती, की तिला 200 फूट उंचीवरुन उडी घेण्याचीही भीती वाटली नाही. या आत्महत्येच्या घटनेतील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे महिलेनं एकटीनं उडी घेतली नाही, तर तिनं आपल्या दोन चिमुकल्या बाळांनाही आपल्या कडेवर घेतलं आणि उडी मारली. ही भयंकर घटना रशियाची राजधानी मॉस्को इथे घडली. महिलेनं आत्महत्या करण्याआधी आपल्या दोन्ही मुलांनाही हातात पकडलं. 19 व्या मजल्याहून उडी घेतल्यानं या घटनेत महिला आणि तिच्या दोन मुलांचाही मृत्यू झाला. महिलेचा पती सैन्यात अधिकारी आहे आणि ही बातमी ऐकताच त्याला धक्का बसला.
  Published by:Sunil Desale
  First published: