Home /News /pune /

जनतेचे कलाकार आधी मुक्त करा, भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी नवी मागणी आली समोर

जनतेचे कलाकार आधी मुक्त करा, भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी नवी मागणी आली समोर

दंगलीस जबाबदार असणाऱ्या मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे या आरोपींना अटक

पुणे, 14 सप्टेंबर: भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ सोमवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी व्हावी. कबीर कला मंचचे शाहीर सागर गोरखे, ज्योती जगताप आणि रमेश गायचोर यांची तत्काळ सुटका करावी आणि या दंगलीस जबाबदार असणाऱ्या मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे या आरोपींना अटक करावी, अशी मागणी समोर आली आहे. हेही वाचा...उद्धव ठाकरे, संजय राऊतांना हवी आहे भाटगिरी, चंद्रकांत पाटलांची घणाघाती टीका भीमा कोरेगाव दंगलीस जबाबदार धरून कबीर कला मंचचे शाहीर सागर गोरखे, ज्योती जगताप आणि रमेश गायचोर यांना बेकायदेशीररित्या अटक करण्यात आली आहे. यापूर्वी अटक केलेल्या सर्व मानवाधिकार कार्यकर्ते, विचारवंत, वकील आणि कलाकार यांची बिनशर्त सुटका करण्यात यावी. भीमा कोरेगाव प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी राज्य सरकारच्या अखत्यारीत विशेष तपास पथकाची (एसआयटी) तत्काळ स्थापना करण्यात यावी, या मागणीसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार, स्वराज अभियान इब्राहिमखान, रिपब्लिकन भारत आकाश साबळे, अखिल महाराष्ट्र कामगार संघटना किशोर कांबळे, सिद्धार्थ दिवे, कबीर कला मंचचे रामदास उन्हाळे, भीमशाही युवा संघ नितीन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते शाहरुख खान, असलम बागवान, राज फैय्याज, एडवोकेट क्रांती सहाने, एडवोकेट तैसीफ शेख, क्रांतिसूर्य संघटना शुभम जगताप, नितीन जगताप, अक्षय साळवे, विशाल भालेराव सहित शेकडो कार्यकर्त्यांनी अटकेच्या विरोधात निदर्शने केली. कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी शरद पवारांनी केला होता गंभीर आरोप.. दरम्यान, कोरेगाव भीमा दंगलीमागे तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारचं षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. तसेच या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी अशी मागणीही पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पानांचे पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये कोरेगाव भीमा प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. या पत्रात पवारांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. हेही वाचा...लॉकडाउनमध्ये किती मजुरांचा मृत्यू झाला? मोदी सरकार म्हणे, 'कोणताच रेकॉर्ड नाही' भीमा कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची गरज आहे. कारण देवेंद्र फडणवीस सरकारने सत्तेचा चुकीचा वापर केला. फडणवीस सरकारने माध्यमांनाही चुकीची माहिती दिली. तसेच पोलिसांच्या मदतीने हे घडवलेले षडयंत्र होते. मुख्य सूत्रधारांना पाठीशी घालून जनतेची दिशाभूल करण्याचा डाव होता, असा आरोप शरद पवारांनी केला आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Pune news

पुढील बातम्या