Home /News /national /

लॉकडाउनमध्ये किती प्रवासी मजुरांचा मृत्यू झाला? मोदी सरकार म्हणे, 'कोणताच रेकॉर्ड नाही'

लॉकडाउनमध्ये किती प्रवासी मजुरांचा मृत्यू झाला? मोदी सरकार म्हणे, 'कोणताच रेकॉर्ड नाही'

लॉकडाउन लागू झाल्यामुळे मुंबईसह देशभरातील मजुरांनी आपल्या गावाची वाट धरली होती.

    नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : संसदेचं पावसाळी  अधिवेशन (monsoon session) सुरू झाले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये  किती प्रवासी मजुरांचा मृत्यू झाला असा प्रश्न विरोधकांनी उपस्थितीत केला होता. यावर मोदी सरकारने आपल्याकडे कोणतीही माहिती आणि संख्या नाही, असं स्पष्ट केले आहे. लॉकडाउन लागू झाल्यामुळे मुंबईसह देशभरातील मजुरांनी आपल्या गावाची वाट धरली होती. हजारो किलोमीटर पायपीट करून मजूर आपल्या गावी पोहोचले होते. हजारो किलोमीटरचा प्रवास करत असताना अनेक मजुरांना आपला जीव गमवावा लागला होता. याच मुद्दावरून  विरोधकांनी प्रवासी मजुरांबद्दल प्रश्न उपस्थितीत केले. सरकारकडे प्रवासी मजुरांची संख्या किती आहे. त्या मजुरांची ओळख पटवता आली आहे का? सरकारने प्रवासी मजुरांचा मृत्यू झाला तर त्यांची नोंद ठेवली गेली का? असे प्रश्न संसदेत उपस्थितीत करण्यात आले होते. संसद अधिवेशनापूर्वी कोरोना चाचणी; 30 टक्के खासदार, दोन मंत्री निघाले पॉझिटिव्ह त्याचबरोबर लॉकडाउनच्या काळात रेशन कार्डधारक लोकांना मोफत धान्य वाटप करण्यात आले आहे का? जर केले असेल तर किती प्रमाणात वाटप करण्यात आले आहे. सरकारने या व्यतिरिक्त कोणत्या उपाययोजना केल्या याची माहितीही विचारण्यात आली आहे. लोकसभेत विरोधकांनी प्रश्नांची सरबती केल्यानंतर मंत्री संतोष कुमार गंगवार  यांनी लिखित उत्तर दिले आहे. देशात केंद्र आणि राज्य सरकार आहे. त्याचबरोबर स्थानिक पालिका सुद्धा आहे. पण, कोरोनाविरोधात लढत असताना प्रवासी मजुरांच्या मृत्यूबद्दल संख्या गोळा करण्यात आली नाही. तर लॉकडाउनच्या काळात किती रेशन कार्डधारकांना अन्न धान्य वाटप करण्यात आले याबद्दल मंत्रालयाने सांगितले की, प्रत्येक राज्यानुसार आकडेवारी उपलब्ध नाही. परंतु, संपूर्ण देशात 80 कोटी लोकांना पाच किलो अतिरिक्त तांदूळ किंवा गहू, एक किलो दाळ नोव्हेंबर 2020 तक देण्यात आले आहे. या शिवाय सरकारकडून लॉकडाउनच्या काळात गरीब कल्याण योजना, आत्मनिर्भर भारत पॅकेज, EPF स्कीम सारखे मोठे निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले आहे. संसदेचं अधिवेशन सोडून राहुल गांधी परदेशात; सरकारला घेरण्याची संधी पुन्हा गमावली मार्च महिन्यात अचानक लॉकडाउन लागू झाल्यामुळे लाखो मजूर रस्त्यावर उतरले होते. रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक बंद झाल्यामुळे मजुरांना पायपीट करावी लागली होती. या दरम्यान, झालेल्या अपघातात मजुरांचा हकनाक बळी गेला. तर काही मजुरांचा अन्न पाणी न मिळाल्यामुळे मृत्यू झाला.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Opposition

    पुढील बातम्या