मराठी बातम्या /बातम्या /पुणे /लग्नानंतर अवघ्या 7 महिन्यांतच तरुणाची आत्महत्या, पुण्यात बायकोविरोधात गुन्हा

लग्नानंतर अवघ्या 7 महिन्यांतच तरुणाची आत्महत्या, पुण्यात बायकोविरोधात गुन्हा

पुण्यातील धक्कादायक प्रकार! बायकोच्या त्रासाला कंटाळून पतीनं उचललं टोकाचं पाऊल

पुण्यातील धक्कादायक प्रकार! बायकोच्या त्रासाला कंटाळून पतीनं उचललं टोकाचं पाऊल

पुण्यातील धक्कादायक प्रकार! बायकोच्या त्रासाला कंटाळून पतीनं उचललं टोकाचं पाऊल

पुणे, 31 डिसेंबर: मानसिक छळामुळे पतीनंच आपलं आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार हडपसमध्ये घडला. पत्नी आणि तिच्या घरच्यांचा जाचाला कंटाळून पतीनं घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी पत्नी आणि तिच्या घरच्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हडपसरमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून गेल्या महिन्याभरात तीन तरुणांनी आत्महत्या केला होत्या. आता पुन्हा एकदा पत्नीच्या त्रासाला कंटाळून तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सतीश गायकवाड असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नावं आहे. तो 22 वर्षांचा होता.

सतीश पुण्यात मेडिकल स्टोअर्समध्ये कामाला होता.  7 महिन्यांपूर्वी सतीशचा विवाह झाला होता. त्या पत्नी एका रुग्णालयात कामाला होती. काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. पत्नी, मेहुणी आणि सासू सासरे मानसिक छळ करत असल्यानं तो नैराश्येत होता. पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून त्याने 23 डिसेंबरला राहत्या घरी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. सतत घालून पाडून बोलणं, मानसिक छळ करणं, सातत्यानं प्रत्येक गोष्टीत अपमान करत असल्यानं सतीश नैराश्येत होता. लग्नानंतर अवघ्या 7 महिन्यात पत्नीच्या जाचाला कंटाळून तरुणानं टोकाचा निर्णय घेतला.

हेही वाचा-तरुणाने तब्बल 2 कोटींची आलिशान मर्सिडीज कार हेलिकॉप्टरने दिली फेकून, VIDEO

दरम्यान सतीशच्या या अवस्थेला त्याच्या पत्नीच्या घरचे जबाबदार असल्याची फिर्यात सतीशच्या आईनं दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सतीश गायकवाडला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याची पत्नी, मेहुणी, सासू-सासरे, मेहुणा यांच्यावर हडपसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. दरम्यान हडपसरमध्ये पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. महिन्याभरात याआधी तीन तरुणांनी याच कारणामुळे आत्महत्या केली होती.

हेही वाचा-स्कॉर्पिओमध्ये टाकून ATM मशीन केलं लंपास, चोरट्यांच्या चोरीचा VIDEO VIRAL

First published:

Tags: Hadapsar, Hadapsar police, Pune, Sucide attempt