जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / तरुणाने तब्बल 2 कोटींची आलिशान मर्सिडीज कार हेलिकॉप्टरने दिली फेकून, पाहा हा VIDEO

तरुणाने तब्बल 2 कोटींची आलिशान मर्सिडीज कार हेलिकॉप्टरने दिली फेकून, पाहा हा VIDEO

तरुणाने तब्बल 2 कोटींची आलिशान मर्सिडीज कार हेलिकॉप्टरने दिली फेकून, पाहा हा VIDEO

हेलिकॉप्टरद्वारे कार लिफ्ट केली आणि हजारो फूट उंचावरून ही कार फेकून दिली. मोराझने याबद्दल एक 7 मिनिटांचा व्हिडिओही तयार केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 28 डिसेंबर : जर कारमध्ये तांत्रिक बिघाड झाला किंवा काही खराब आली तर तुम्ही काय करता? साहजिकच कार सर्व्हिंस सेंटरमध्ये किंवा गॅरेजमध्ये घेऊन जातो. मात्र, एका पठ्ठ्याने कार खराब झाली म्हणून तब्बल 2 कोटी किंमतीची मर्सिडिज कार हेलिकॉप्टरद्वारे हवेतून जमिनीवर फेकून दिली. इगोर मोरोझ (Igor Moroz) असं या तरुणाचं नाव आहे. त्याने हेलिकॉप्टरद्वारे कार लिफ्ट केली आणि हजारो फूट उंचावरून ही कार फेकून दिली. मोराझने याबद्दल एक 7 मिनिटांचा व्हिडिओही तयार केला आहे. मोरोझकडे Mercedes-AMG G63 ही अत्यंत महागडी एसयुव्ही होती. मागील वर्षी 2018 मध्ये मोरोझने  2,70,000 डॉलर म्हणजेच जवळपास 2 कोटी रूपये खर्च करून Mercedes-AMG G63  ही एसयुव्ही खरेदी केली होती. परंतु, काही दिवसांनंतर या कारमध्ये तांत्रिक अडचणी येत होत्या. बऱ्याच वेळा ही कार गॅरेजमध्येच उभी होती. एवढंच नाहीतर वारंटी असताना सुद्धा या कारच्या दुरस्तीबद्दल नकार देण्यात आला होता, असं सांगण्यात आलं.

परंतु, Kolesa वेबसाइटवर याबद्दल वेगळाच खुलासा करण्यात आला आहे. या कारमध्ये कोणतीही तांत्रिक अडचण नव्हती. मोरोझने आपल्या मित्रांसोबत महागडी कार ही हवेतून फेकण्याची पैज लावली होती. मोरोझने हा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओला 5 लाखांहुन अधिक जणांनी पाहिला आहे. त्याच्या या पराक्रमामुळे रशियन पोलीसही चक्रावून गेले आहे. नेमकं असं का घडलं, याबद्दल तपास सुरू केला आहे. अशी आहे मर्सिडीज AMG G63 कार Mercedes-AMG G63 ही एसयुव्ही कार मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात लाँच करण्यात आली होती. या कारमध्ये तब्बल 4.0 लिटरचे  bi-turbo V8 पेट्रोल इंजिन आहे. या अवाढव्य इंजिनमुळे  585 bhp पॉवर आणि 850 Nm चा पीक जेनरेट मिळतो. या कारच्या नव्या व्हर्जनमध्ये 9 स्पीड ऑटोमॅटिक एएमजी स्पीड शिफ्ट ट्रान्समिशन दिलं आहे. ही कार 0 ते 4.5 सेकंदात 100 किमीचा वेग गाठते. या कारचा सर्वाधिक वेग 220 किमी. प्रति तास इतका आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: dropped , Man
  • First Published :
जाहिरात
जाहिरात