जाहिरात
मराठी बातम्या / Viral / स्कॉर्पिओमध्ये टाकून ATM मशीन केलं लंपास, चोरट्यांच्या धुम स्टाईल चोरीचा VIDEO VIRAL

स्कॉर्पिओमध्ये टाकून ATM मशीन केलं लंपास, चोरट्यांच्या धुम स्टाईल चोरीचा VIDEO VIRAL

स्कॉर्पिओमध्ये टाकून ATM मशीन केलं लंपास, चोरट्यांच्या धुम स्टाईल चोरीचा VIDEO VIRAL

चोरीचा नवा फंडा! पुण्यातील चोरट्यांनी पैशांसकट पळवली ATM मशीन.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 29 डिसेंबर : भारतात एटीएम मशीनमधून पैसे चोरीला गेल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. मात्र पुण्यात चोरीचा एक भलताच प्रकार घडला. चोरट्यांनी पैसे नाही तर थेट ATM मशीनची चोरी केली. या चोरट्यांनी एटीएम लुटण्याचा प्रयत्न एका वेगळ्या मार्गाने केला. या चोरांनी फक्त पैसे चोरी न करता महिंद्रा स्कॉर्पिओमधून एटीएम मशीन लंपास केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. ही घटना पुण्यात घडली असून पोलीस या चोरांचा तपास करत आहेत. वाचा- तरुणीने लाळेने अनलॉक केला फोन! बायफ्रेंडने Tiktokवर दाखवलं गर्लफ्रेंडचं टॅलेंट चोरीच्या या नव्या स्टाईलनं सर्वांना हैराण केले आहे. पुण्यातील या चोरट्यांनी संपूर्ण मशीन उचलल्यानंतर मशीनमधून पैसे काढण्यासाठी वेगवेगळी शस्त्रे आणि उपकरणे वापरली. एटीएम चोरणाऱ्यांचा सीसीटीव्ही फुटेज इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये काहीजण पांढर्‍या महिंद्रा स्कॉर्पिओमध्ये पोहोचतात आणि एटीएम मशीन गाडीमध्ये टाकल्यानंतर पळून जातात असे फुटेजमध्ये दिसून आले आहे. या कारचा वाहन क्रमांक सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर पोलीस या चोरांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी ज्या एटीएम मशीनची चोरी केली होती त्यांची किंमत 9.72 लाख रुपये होती. सुरक्षारक्षकांविना हा एटीएम लुटल्याची घटना पुण्याच्या बडवाडी गावात घडली. वाचा- तरुणाने तब्बल 2 कोटींची आलिशान मर्सिडीज कार हेलिकॉप्टरने दिली फेकून, VIDEO

वाचा- इच्छाशक्तीला सलाम! दिव्यांग मुलाची बॅटिंग पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी या प्रकरणात पोलिसांना अद्याप कोणालाही अटक करण्यात यश आले नाही. रिपोर्ट्सनुसार पोलिसांच्या पेट्रोल पथकाने एसयुव्हीला वेगात धावताना पाहिले आणि पाठलाग केला, परंतु त्यांचा मार्ग थांबविण्यात अक्षम झाला. ही घटना अवघ्या 1 मिनिटात 20 सेकंदात घडली. ही बाब 15 डिसेंबरची आहे, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात