मुंबई, 10 मे : राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढविण्याचे संकेत देण्यात आहेत. त्यामुळे सध्या 15 मे पर्यंत लागू केलेला लॉकडाऊन वाढवून 30 मेपर्यंत करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लवकरच कॅबिनेटमध्ये याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील परिस्थिती अजूनही जैसे थे असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन वाढविण्यासाठी मागणी केली जात आहे. त्यामुळे आहे त्या निर्णयात कोणतीही सूट नसेल असे सांगण्यात आले आहे. आता 15 मेपर्यंत हा लॉकडाऊन लावण्यात येण्याची शक्यता आहे. तोच पुढे वाढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे ही वाचा- कोरोना विषाणूच्या निर्मितीसाठी 6 वर्षापासून सुरू होता चीनचा प्लॅन? वाचा कारण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Second Wave of Coronavirus) कहर सुरू आहे. मागील चार दिवसांपासून सलग 4 लाखाहून अधिक दैनंदिन रुग्णसंख्या (Corona Cases) आढळत आहे. इतकंच नाही तर मृतांचा आकडाही चार हजारावर पोहोचत आहे. अशात लोकांच्या मनात मोठा सवाल आहे, की या लाटेतील रुग्णसंख्येचा उच्चांक (Covid-19 Second Wave Peak) नेमका कधी असेल आणि कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा कधी घटेल. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत देश आणि विदेशातील अनेक तज्ज्ञांनी वेगवेगळे अंदाज वर्तवले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.