मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मोठी बातमी..! मुंबई महापालिका 50 लाख लशी ग्लोबल टेंडर काढून खरेदी करणार

मोठी बातमी..! मुंबई महापालिका 50 लाख लशी ग्लोबल टेंडर काढून खरेदी करणार

मुंबई महापालिका कोरोना लसीकरणासाठी 50 लाख लशी ग्लोबल टेंडर काढून खरेदी करणार आहेत. याबाबतची माहिती मुंबई महापालिका महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

मुंबई महापालिका कोरोना लसीकरणासाठी 50 लाख लशी ग्लोबल टेंडर काढून खरेदी करणार आहेत. याबाबतची माहिती मुंबई महापालिका महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

मुंबई महापालिका कोरोना लसीकरणासाठी 50 लाख लशी ग्लोबल टेंडर काढून खरेदी करणार आहेत. याबाबतची माहिती मुंबई महापालिका महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 10 मे : देशात कोरोनाची स्थिती बिकट असताना आणि सर्वत्र लसींचा पुरवठा कमी पडत असताना मुंबई शहरातील (Mumbai corona update) कोरोना स्थिती काहीशी नियंत्रणात असल्याचे रोजच्या रुग्णांच्या आकडेवारीवरून दिसत आहे. यात आता लवकरच आणखीन सुधारणा होण्याची अपेक्षा आहे, कारण मुंबई महापालिका कोरोना लसीकरणासाठी 50 लाख लसी ग्लोबल टेंडर काढून खरेदी करणार आहेत. याबाबतची माहिती मुंबई महापालिका महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori pednekar) यांनी दिली. येत्या दोन दिवसात पालिका आयुक्त लसीसाठीचे ग्लोबल टेंडर काढतील, सगळ्यांना मोफत लस देता येईल असे त्यांनी सांगितले.

येत्या दोन दिवसात पालिका आयुक्त लसीसाठीचे ग्लोबल टेंडर काढतील, सगळ्यांना मोफत लस (Corona Vaccine) देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही पेडणेकर म्हणाल्या. जे मोफत लस द्या म्हणून गळे काढत आहेत, त्यांनी पालिका सेंटरवर येवून पाहावं, तिथं कोरोना लस मोफतच दिली जातेय, असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला. सध्या लसीकरणासंबंधीत कोविन अ‌ॅपमध्ये त्रुटी जाणवत आहेत. विरोधक आयुक्तांपुढे गोड गोड बोलतात आणि बाहेर येवून आकड्यांची लपवाछपवी केली म्हणून सांगतात. मग तुम्हाला शंका आहे तर तिथंच आयुक्तांना का विचारात नाहीत, खोडे घालायचे तेवढे घाला, आम्ही काम करत राहू, असे खडे बोल त्यांनी विरोधकांना सुनावले.

हे वाचा - रुग्णालयाला कोरोनाने ग्रासलं; 80 जणांना संसर्ग, 27 वर्षे सेवा देणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरचा मृत्यू

दरम्यान, मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान रविवारी 19 हजार 631 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 27 लाख 00 हजार 431 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. यामुळे मुंबईने लसीकरणाचा 27 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान लस घेण्यासाठी नागरिकांनी कोविन ऍपवर नोंद केल्यानंतर मोबाईलवर संदेश आला तरच लसीकरणाला यावे, असे आवाहन मुंबई पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुंबईती कोरोना स्थिती नियंत्रणात आल्याचे दिसत आहे. दिवसा 10 ते 11 हजारांपर्यंत सापडणारी रुग्णसंख्या 2 ते 3 हजारापर्यंत खाली आल्याने दिलासादायक चित्र आहे. मुंबईत लसीकरणही मोठ्या प्रमाणावर करण्यात आले आहे.

First published:

Tags: BMC, Corona vaccine, Kishori pedanekar, Mumbai News