पुणे, 08 ऑक्टोबर: पुण्यातील एका कामगार अड्ड्यावर थांबलेल्या महिलेला काम देण्याचा बहाणा (Pretext of giving work) करत आरोपीनं तिच्यासोबत भयावह कृत्य केलं आहे. गवत कापण्याचं काम देतो, असं सांगून आरोपी फिर्यादी महिलेला कानिफनाथ डोंगर परिसरात घेऊन गेला होता. याठिकाणी कोणी पहात नसल्याचं पाहून आरोपीनं फिर्यादीला थेट दगडानं मारहाण (Beat with stone and robbed) करण्यास सुरुवात केली. तसेच तिच्या अंगावरील सर्व दागिने घेऊन आरोपी फिर्यादीला घटनास्थळी सोडून पळून गेला आहे. याप्रकरणी पीडितेनं कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच मजूर अड्ड्यावरील महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. श्रीनिवास गणेश जाधव असं अटक केलेल्या संशयित आरोपीचं नाव असून पोलिसांनी आरोपीला कर्नाटकातून बेड्या ठोकल्या आहेत. संबंधित घटना 1 सप्टेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडली आहे. यादिवशी फिर्यादी महिला कोणार्क पुरम सोसायटी समोरील मजूर अड्ड्यावर थांबल्या होत्या. यावेळी आरोपी याठिकाणी आला. तसेच कानिफनाथ डोंगराशेजारी गवत कापण्याचं काम असल्याची बतावणी केली. यानंतर आरोपी रिक्षातून फिर्यादी महिलेला कानिफनाथ डोंगर परिसरात घेऊन गेला. हेही वाचा- धक्कादायक! मदत करणाऱ्या मामाच्या मुलीचाच काढला काटा; आधी गाडीवर बसवलं आणि मग… याठिकाणी आरोपीनं पीडितेवर अचानक दगडानं हल्ला केला. तसेच तिला मारहाण करत तिच्या अंगावरील सर्व दागिने काढून घेतले. यानंतर आरोपी फिर्यादी महिलेला जखमी अवस्थेत घटनास्थळी सोडून तेथून पळून गेला. यानंतर जखमी अवस्थेतच पीडित महिलेनं कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे आरोपीची ओळख पटवली. हेही वाचा- कारखाना मालकांकडून विवाहितेसोबत विकृतीचा कळस; 31 वर्षांपासून देत होते नरक यातना तसेच आरोपी जाधव हा पुण्यातील जगताप नगर परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याठिकाणी पोलिसांनी तपास केला पण त्याचा काही थांगपत्ता लागला नाही. यानंतर कोंढवा पोलिसांनी सापळा रचून आरोपीला त्याचं मुळ गाव कर्नाटकातून अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. तसेच आरोपीनं अशाप्रकारे आणखी कोणाला लुटलं आहे का? याचा तपास केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.