गुरुग्राम, 08 ऑक्टोबर: गेल्या काही दिवसांपासून देशाला हादरवून सोडणाऱ्या धक्कादायक घटना उघडकीस येत आहेत. यानंतर आता दोन कारखाना मालकांकडून एका विवाहित महिलेवर तब्बल 31 वर्षे अत्याचार केल्याची (factory owner gang raped married woman) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी गेल्या 31 वर्षांपासून पीडित महिलेवर अनेकदा सामूहिक अत्याचार करत नरक यातना (married woman raped from last 31 years) दिल्या आहेत. आरोपी नराधमांनी एकदा पीडित महिलेचा गर्भपातही केला आहे. आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं अखेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही कारखाना मालकांविरोधात बलात्कारसह जीवे मारण्याची धमकी आणि छळाच्या अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ओमप्रकाश शर्मा आणि सतीश शर्मा उर्फ पिंकी असं संबंधित दोन्ही आरोपींची नावं आहेत. पीडितेनं दिलेल्या माहितीनुसार, 1990 साली पीडितेचं लग्न झालं होतं. लग्नानंतर तिचा पती तिला घेऊन उत्तर प्रदेशातून गुरुग्रामला आला होता. येथील सेक्टर 37 मधील एका कंपनीत पीडितेचा पती मशीन ऑपरेटर म्हणून काम करत होता.
हेही वाचा-संतापजनक! जात पंचायतीकडून महिलेस नग्न करत मारहाण; महाराष्ट्राला हादरवणारी घटना
संबंधित कारखाना मालकांनी या दाम्पत्याला कारखाना परिसरातच राहण्यासाठी एक खोली दिली होती. या खोलीच्या बाजूलाच आरोपी ओमप्रकाश शर्मा आणि सतीश शर्मा याचं कार्यालय होतं. त्यामुळे आरोपीनं पीडित महिलेला कार्यालय स्वच्छ करण्याचं काम दिलं. दरम्यान 5 ऑगस्ट 1990 साली आरोपी ओमप्रकाशनं पीडितेवर पहिल्यांदा अत्याचार केला. पीडित महिलेनं याची माहिती सतीश शर्मा याला दिली. पण त्यानं गप्प राहण्यास सांगितलं. तसेच घटनेची वाच्यता केल्यास तुला आणि तुझ्या नवऱ्याला जीवे मारू अशी धमकी दिली. यामुळे पीडित महिला घाबरली.
हेही वाचा-धक्कादायक! मदत करणाऱ्या मामाच्या मुलीचाच काढला काटा; आधी गाडीवर बसवलं आणि मग...
यानंतर दोन्ही आरोपींनी पीडितेवर अनेकदा अत्याचार केला. या अत्याचारातून पीडित महिला एकदा गर्भवती देखील राहिली होती. पण आरोपींनी जबरदस्ती करत तिला गर्भपात करण्यास भाग पाडलं. नराधम आरोपी अशाच प्रकारे वेळोवेळी पीडित महिलेवर अत्याचार करत होते. आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर बुधवारी पीडित महिलेनं महिला ठाणा पश्चिम येथे जात दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Gang Rape