मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

धक्कादायक! मदत करणाऱ्या मामाच्या मुलीचाच काढला काटा; आधी गाडीवर बसवलं आणि मग...

धक्कादायक! मदत करणाऱ्या मामाच्या मुलीचाच काढला काटा; आधी गाडीवर बसवलं आणि मग...

Murder in Beed: एका तरुणानं आर्थिक मदत (Murder in money dispute) करणाऱ्या मामाच्या मुलीची निर्घृण हत्या (cousin sister brutal Murder) केली आहे.

Murder in Beed: एका तरुणानं आर्थिक मदत (Murder in money dispute) करणाऱ्या मामाच्या मुलीची निर्घृण हत्या (cousin sister brutal Murder) केली आहे.

Murder in Beed: एका तरुणानं आर्थिक मदत (Murder in money dispute) करणाऱ्या मामाच्या मुलीची निर्घृण हत्या (cousin sister brutal Murder) केली आहे.

  • Published by:  News18 Desk

बीड, 08 ऑक्टोबर: गरजेच्या वेळी एखाद्या व्यक्तीला आर्थिक मदत करणं देखील जीवावर बेतू शकतं, याचा प्रत्यय नुकताच बीड जिल्ह्यातील गेवराई येथे आला आहे. येथील एका तरुणानं आर्थिक मदत (Murder in money dispute) करणाऱ्या मामाच्या मुलीची निर्घृण हत्या (cousin sister brutal Murder) केली आहे. आर्थिक देवाण-घेवाणीतून हत्या झाल्याची  प्राथमिक माहिती गेवराई पोलिसांनी दिली आहे. आरोपी आतेभाऊ सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी या घटनेची उकल केल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

राधाबाई माणिकराव गायकवाड असं हत्या झालेल्या 34 वर्षीय महिलेचं नाव आहे. गेल्या आठवड्यात राधाबाई यांचा मृतदेह राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या रांजणीजवळ आढळून आला होता. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने महिलेची ओळख पटवणं अवघड काम होतं. पण पोलिसांनी मृतदेहाच्या आसपास मिळालेल्या वस्तूंच्या आधारे मृत महिलेची ओळख पटवली आहे. यानंतर पोलिसांनी या घटनेची कसून तपास करत हत्येचा उलगडा केला आहे.

हेही वाचा-मुंबई पुन्हा हादरली; 6 वर्षीय चिमुकलीसोबत डिलिव्हरी बॉयचं घृणास्पद कृत्य

याप्रकरणी गेवराई पोलिसांनी तपास केला असता, ही हत्या राधाबाई यांच्याच आतेभावानं केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 15 दिवसांपूर्वी मृत राधाबाई या आपल्या बहिणीला भेटायला गेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी आपल्या घरी परत येत असताना, आरोपी आतेभाऊ सुभाष शेरे यानं राधाबाई यांचा रस्ता आडवला आणि तिला आपल्या दुचाकीवर बसवून नेलं. ही घटना गावातील काही लोकांनी पाहिलं. यानंतर आरोपीनं आपल्या मामाच्या मुलीची निर्घृण पद्धतीने हत्या करत तिचा मृतदेह राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या रांजणी येथे टाकला.

हेही वाचा-मॉर्निंग वॉकला नेत आईचा केला विश्वासघात; मुलीनं BF च्या मदतीनं लांबवले 1 कोटी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत राधाबाई यांनी काही दिवसांपूर्वी आपला आतेभाई सुभाष शेरे याला अडीच लाख रुपये उसने दिले होते. यानंतर राधाबाई आरोपी सुभाषकडे वारंवार पैसे परत मागत होत्या. पण सुभाष फक्त तारखा देत होता. तगादा लावूनही सुभाष पैसे देत नसल्यानं राधाबाईनं याची माहिती आपल्या भावाला दिली. राधाबाई आणि त्यांच्या भावाने सुभाषकडे परत पैशाची मागणी केली. तरीही सुभाष पैसे देत नव्हता. सतत पैशांचा तगादा लावल्यानेच सुभाषने मदत करणाऱ्या आपल्या मामाच्या मुलीची हत्या केली आहे. या घटनेचा पुढील तपास गेवराई पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Beed, Crime news, Murder Mystery