• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • मोठी बातमी, पुण्यात lockdown ठरला फायदेशीर, कोरोना पॉझिटिव्हचे प्रमाण घटले!

मोठी बातमी, पुण्यात lockdown ठरला फायदेशीर, कोरोना पॉझिटिव्हचे प्रमाण घटले!

पुणे जिल्ह्याचा विचार करता 1 ते 7 एप्रिल या आठवड्यामध्ये कोरोना चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हीट असलेल्यांचं प्रमाण 41.27 टक्के एवढं होतं. मात्र

  • Share this:
पुणे, 15 एप्रिल : प्रत्येकाच्या चिंता वाढवणाऱ्या पुण्यातल्या (Pune) कोरोनाच्या बातम्यांमध्ये गुरुवारी एक काहीसी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारनं कोरोनाला आळा घालण्यासाठी सुरू केलेल्या ब्रेक द चेन (Break the chain) मोहिमेचा सकारात्मक परिणाम दिसत असल्याचं समोर येत आहे. दोन आठवड्यांच्या रुग्णांना लागण होण्याच्या आडेवारीवरून अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाचं अत्यंत भयावह असं रुप पाहायला मिळत होतं. रोज वाढत जाणारी कोरोना रुग्णांची संख्या. बेडची अनुपलब्धता, औषधांचा तुटवडा, काळाबाजार, ऑक्सिजनची कमतरचा अशा एक नव्हे अनेक संकटांनी जणू पुण्याला गराडा घातला होता. पण या सर्व नकारात्मक बातम्यांमध्ये गुरुवारी समोर आलेल्या एका आकडेवारीनं काहीसा दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या चाचणीनंतर टेस्ट पॉझिटिव्ह येण्याच्या प्रमाणात मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात घट झाली आहे. प्रशासनाकडून समोर आलेल्या या आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्याचा विचार करता 1 ते 7 एप्रिल या आठवड्यामध्ये कोरोना चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हीट असलेल्यांचं प्रमाण 41.27 टक्के एवढं होतं. मात्र 8 ते 14 एप्रिल या आठवड्यामध्ये हे प्रमाण 31.34 झालं आहे. म्हणजे जवळपास 10 टक्क्यांनी हे प्रमाण घटलं असून ही अत्यंत दिलासादायक अशी बाब आहे. (वाचा - Shocking : कोरोनानं घेतला पतीचा बळी, पत्नीची तीन वर्षीय मुलासह आत्महत्या) पुणे शहर किंवा मनपा हद्दीचा विचार करता 25 ते 31 मार्च दरम्यान चाचण्या पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण 22.17 टक्के होतं. 1 ते 7 एप्रिलच्या आठवड्यामध्ये हे प्रमाण वाढून 25.58 टक्के झालं. तर 8 ते 14 एप्रिलच्या आठवड्यात ते पुन्हा कमी होऊन 23.17 टक्के झालं आहे. मनपा हद्दीतील टक्केवारी कमी होण्याचं प्रमाण फारसं नसलं तरी आकडे कमी होत असल्यानं दिलासा व्यक्त करण्यात येत आहे. पुण्याच्या अतिरिक्त आयुक्तांनी ही माहिती दिली आहे. (वाचा - धक्कादायक! सरकारी रुग्णालयात कोरोना रुग्णांना पार्सलने दिली दारू, असा झाला उलगडा) राज्य सरकारनं कोरोनाच्या संसर्गाचं प्रमाणं कमी करण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. त्याचअंतर्गत राज्य सरकारनं गेल्या काही दिवसांपासून ब्रेक द चेन अंतर्गत काही कडक निर्बंध लादले आहेत. राज्यात कडक निर्बंध असताना पुण्यात तर परिस्थिती गंभीर असल्यानं मिनी लॉकडाऊनही जाहीर करण्यात आला होता. या सर्वाचा चांगला परिणाम दिसत असून रुग्णांना लागण होण्याचं प्रमाण घटत असल्याचं अतिरिक्त आयुक्तांनी म्हटलं आहे. त्यामुळं नागरिकांनी सहकार्य केल्यास आगामी काळात निर्बंधांमुळं हे प्रमाण आणखी कमी करणं शक्य असल्याचा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे.
Published by:News18 Desk
First published: