Shocking : कोरोनानं घेतला पतीचा बळी, पत्नीची तीन वर्षीय मुलासह आत्महत्या

Shocking : कोरोनानं घेतला पतीचा बळी, पत्नीची तीन वर्षीय मुलासह आत्महत्या

हनुमंत गदम हे मूळचे तेलंगणा राज्यातील होते. हातावर पोट असल्याने उदरनिर्वाहासाठी म्हणून कुटुंबासह ते महिनाभरापूर्वी नांदेडच्या लोहा इथं आले होते. गदम यांच्या पत्नी पद्मा, दोन मुलं आणि एक मुलगी असं पाच जणांचं हे कुटुंब लोह्यात बालाजी मंदिराच्या मागे असलेल्या झोपडपट्टीमध्ये राहत होतं.

  • Share this:

नांदेड, 15 एप्रिल : कोरोनाच्या या संकटामध्ये नांदेड जिल्ह्यातून आणखी एक मन सुन्न करणारी अशी घटना समोर आली आहे. कोरोनामुळं पतीचा मृत्यू झाल्यानं पच्नीनं तीन वर्षीय चिमुरड्यासह आत्महत्या (Suicide of woman after husband died by corona) केली. नांदेडच्या लोहा शहरात हा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे मूळचं हातावर पोट असलेलं तेलंगणातलं असलेलं हे कुटुंब महिनाभरापूर्वीच लोह्यामध्ये उदरनिर्वाहासाठी आलं होतं. मात्र, कोरोनानं सर्वकाही होत्याचं नव्हतं करून टाकलं. (woman did suicide with 3 year old son)

लोहा येथील भटक्या समाजाच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या 40 वर्षीय हनुमंत गदम यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर लोहा येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण कोरोनावरील उपचारादरम्यान हनुमंत यांचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूमुळं हनुमंत यांच्या पत्नी पद्मा गदम यांना प्रचंड धक्का बसला. त्यांमुळं त्यांनी त्यांच्या लल्ली नावाच्या तीन वर्षाच्या मुलासह तलावात उडी घेत आत्महत्या केली. कुटुंबातील कर्त्या पुरुषाचंच निधन झाल्यानं खचून गेलेल्या पद्मा यांनी हे पाऊल उचललं.

(वाचा-सावधान! लहान मुलांमध्येही वाढतोय कोरोनाचा संसर्ग; नवजात बालकांनाही धोका )

हनुमंत गदम हे मूळचे तेलंगणा राज्यातील होते. हातावर पोट असल्याने उदरनिर्वाहासाठी म्हणून कुटुंबासह ते महिनाभरापूर्वी नांदेडच्या लोहा इथं आले होते. गदम यांच्या पत्नी पद्मा, दोन मुलं आणि एक मुलगी असं पाच जणांचं हे कुटुंब लोह्यात बालाजी मंदिराच्या मागे असलेल्या झोपडपट्टीमध्ये राहत होतं. या झोपडपट्टीत भटक्या विमुक्त समाजाचे अनेक लोक वास्तव्यास आहेत. त्यांच्याबरोबर हे कुटुंब राहत होतं. हे सर्व लोक मोल मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. पण कोरोनाचा प्रकोप वाढल्यानं नांदेड जिल्ह्यात 25 मार्चपासून लॉकडाऊन लावण्यात आला. त्यानंतर कामं बंद झाली. शेतात किंवा इतरही कामं मिळेना म्हणून अखेर भीक मागून जगावं लागत होतं. पण या संघर्षाच्या काळातच कोरोनानं त्यांना घेरलं. घरातील कर्ता पुरुषच कोरोनानं मरण पावल्यानं पद्मा यांना भविष्य अंधारात दिसू लागलं. तीन मुलांचं काय होणार या चिंतेपोटी त्यांनी 3 वर्षाच्या चिमुरड्यासह तलावात उडी घेत जीवन संपवलं.

(वाचा - प. बंगालमध्ये कोरोनाचा कहर; काँग्रेस उमेदवाराचा रुग्णालयातच मृत्यू)

हनुमंत गदम यांचा कोरोनानं निधन झालं, तर त्यांच्या पत्नीनं एका मुलासह आत्महत्या केली. पण कुटुंबातील 6 वर्षीय मुलगी आणि 5 वर्षाचा एक त्यांचा मुलगा हे भाऊ बहीण आता पोरके झाले आहेत. आर्थिक परिस्थितीमुळं अत्यंत हलाखीचं जीवन जगताना आता या चिमुरड्यांच्या डोक्यावर आई-बापाचं छत्रही नसणार हे भयाण वास्तव मन सुन्न करणारं असं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: April 15, 2021, 4:48 PM IST

ताज्या बातम्या