Shocking! रुग्णालयातील कोविड बाधितांना नातेवाईकच पार्सलद्वारे पोहोचवतायत दारू आणि तंबाखू

Shocking! रुग्णालयातील कोविड बाधितांना नातेवाईकच पार्सलद्वारे पोहोचवतायत दारू आणि तंबाखू

कोरोना बाधित रुग्णांना नातेवाईकच दारू आणि तंबाखू पुरवठा करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • Share this:

यवतमाळ, 15 एप्रिल: कोरोना (coronavirus) बाधित रुग्णांची राज्यात संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली आहे मात्र, या परिस्थितीत कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांकडूनच नियमांचे उल्लंघन (covid patient relatives breaks rules) करत रुग्णाचा जीव धोक्यात टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. होय, ही घटना घडली आहे यवतमाळ जिल्ह्यात. यवतमाळ जिल्ह्यातील (Yavatmal District) वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Vasantrao Naik Government Medical College) येथे कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. मात्र, या ठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांचे नातेवाईकच त्यांना दारू (alcohol) आणि तंबाखू (tobacco) पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

कोरोना बाधित रुग्णांना उपचार सुरू असताना दारू, तंबाखू, सिगारेट यांचे व्यसन करण्यास मनाई आहे. मात्र, व्यसन असलेल्या नागरिकांना याशिवाय चैन पडत नाही आणि या वस्तू मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. यवतमाळमध्ये सुद्धा असाच प्रकार उघडकीस आला आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांकडून पार्सलद्वारे दारू आणि तंबाखू पुरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.

वाचा: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली ही मागणी

येथे उपचार घेत असलेल्या बाधितांपैकी एका रुग्णाच्या नातेवाईकाने बाहेरून खाद्यपदार्थ देण्याच्या नावाखाली चक्क दारू आणि तंबाखूचा पुरवठा करण्याचा बेत आखला. त्यानुसार तो व्यक्ती रुग्णाला पार्सलद्वारे हे घेऊनही गेला मात्र, सुरक्षारक्षकांनी तपासणी केली असता पार्सलमध्ये दारू आणि तंबाखू असल्याचं उघडकीस आलं आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. जर रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईकच अशा प्रकारे कृत्य करत असतील तर कोरोना आटोक्यात येणार तरी कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

यवतमाळ जिल्ह्यात दररोज कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. केवळ बाधितांची संख्या वाढत नाहीये तर मृतकांच्या संख्येतही वाढ होत आहे. मात्र, असे असले तरी नागरिकांमध्ये गांभीर्य दिसत नाहीये. शासनाचे नियम धाब्यावर बसवून आपल्या मर्जीनुसार नागरिक वागत आहेत. सध्यस्थितीत यवतमाळ जिल्ह्यात एकूण 36381 बाधित असून सक्रिय रुग्णांची संख्या 4062 इतकी झाली आहे. तर 795 कोरोना बाधितांनी आपला जीव गमावला आहे.

Published by: Sunil Desale
First published: April 15, 2021, 4:14 PM IST

ताज्या बातम्या