ओव्हरटेक करू दिले नाही म्हणून पोलिसांची महामार्गावर तरुणांना मारहाण, अखेर...

ओव्हरटेक करू दिले नाही म्हणून पोलिसांची महामार्गावर तरुणांना मारहाण, अखेर...

लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी जयराज देवकर व माणिक अहिनवे अशी या निलंबित केलेल्या पोलीस कर्मचार्‍यांची नावे आहेत.

  • Share this:

अनिस शेख, प्रतिनिधी

मावळ, 18 जून :चारचाकी वाहनाला साईड न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दुचाकीवरून जाणार्‍या  तरुणांना मारहाण केल्याप्रकरणी दोन पोलीस कर्मचार्‍यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी जयराज देवकर व माणिक अहिनवे अशी या निलंबित केलेल्या पोलीस कर्मचार्‍यांची नावे आहेत. दोन दुचाकी गाड्यांवरून चार तरुण लोणावळा बाजारपेठेकडे येत असताना मुंबई पुणे महामार्गावर खासगी चारचाकी वाहनांमधून आलेल्या दोन साध्या वेशातील पोलिसांनी दुचाकी गाडीला ओव्हरटेक करण्यासाठी हॉर्न वाजवले.

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, पालिकेनं जाहीर केला नवा आदेश

मात्र, दुचाकीस्वारांकडून पुढे वाहन थांबले असल्याने साईट  देता आली नाही. या कारणावरून दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रफुल बोराडे तसंच त्याचा मित्र सुमित जरांडे या दोघांना बेदम मारहाण केली. मारहाणीत प्रफुल्ला गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

या संपूर्ण घटनेची मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनी गंभीर दखल घेतली असून दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे करण्यात आली होती.

...नाहीतर विष घे! रागात पत्नी बोलली आणि तरुणानं खरंच केली आत्महत्या

संपूर्ण घटनेची शहानिशा करून अवघ्या चार तासातच दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना दोषी ठरवत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्यांचे निलंबन केले आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: June 18, 2020, 11:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading