जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / ...नाहीतर विष घे! रागात पत्नी बोलली आणि तरुणानं खरंच केली आत्महत्या

...नाहीतर विष घे! रागात पत्नी बोलली आणि तरुणानं खरंच केली आत्महत्या

...नाहीतर विष घे! रागात पत्नी बोलली आणि तरुणानं खरंच केली आत्महत्या

माहेरी गेलेल्या पत्नीसोबत झाला वाद, तरुणानं उचललं हे धक्कादायक पाऊल

  • -MIN READ
  • Last Updated :

इंदूर, 18 जून : लॉकडाऊनआधी माहेर गेलेल्या पत्नीसोबत वाद झाला आणि त्यातून धक्कादायक पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे. लॉकडाऊनआधी माहेरी गेलेल्या पत्नीसोबत फोनवर बोलणं सुरू असताना वाद झाला. राग अनावर न झाल्यानं विष घे असं म्हटल्यानंतर खरंच तरुणानं औषध घेऊन स्वत:चं आयुष्य संपवल्याची घटना इंदूरमध्ये समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार इंदूर इथे डबल चौकी निवासी 27 वर्षीय संदीपनं आत्महत्या केली आहे. इंडेक्स कालेज इथे प्रेस मॅनपदावर संदीप पिता गौरीशंकर काम करत होता. लॉकडाऊनआधी त्याची पत्नी माहेरी बिलावली इथे गेली होती. त्यांचं रोज फोनवर संभाषण व्हायचं. पत्नीला सासरी येण्याबाबात सतत विचारणा सुरू होती. या दोघांमध्ये सासरी येण्यावरून बुधवारी वाद झाला. रागाच्या भरात पत्नीनं विष घे असं सांगितल्यानंतर तरुणानं संदीपने सल्फास खाऊन आत्महत्या केली. दरम्यान कुटुंबीयांनी संदीपला उपचरासाठी रुग्णालयात दाखल केलं मात्र त्याचा मृत्यू झाला होता. हे वाचा- प्रियकराला भेटण्यासाठी आजीला द्यायची झोपेच्या गोळ्या, एकदा आजी अचानक उठली आणि… हे वाचा- नशेखोरीला ऊत… ‘तो’ विकत होता चक्क गर्भपाताच्या गोळ्या, असा झाला भंडाफोड संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात