Home /News /pune /

पिंपरीत तुफान राडा, दगडफेक आणि गाड्यांच्या तोडफोडीनंतर पोलिसांकडून लाठीचार्ज

पिंपरीत तुफान राडा, दगडफेक आणि गाड्यांच्या तोडफोडीनंतर पोलिसांकडून लाठीचार्ज

pune

pune

जमलेल्या नागरिकांना घरात परतवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार आणि बळाचा वापर करावा लागला. ज्यामध्ये एक नागरिक किरकोळ जखमी झाला.

पिंपरी चिंचवड, 08 जून : पिंपरी चिंचवड शहरातील प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या आनंद नगर झोपडपट्टीतील शेकडो नागरिक आज रस्त्यावर उरतल्यानं मोठा तणाव निर्माण झाल्याचं बघायला मिळालं. जमलेल्या नागरिकांना घरात परतवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार आणि बळाचा वापर करावा लागला. ज्यामध्ये एक नागरिक किरकोळ जखमी झाला. त्यामुळे नागरिकांचा रागअनावर झाला आणि त्यांनी पोलिसांवर तुफान दगड फेक करत त्यांच्या वाहनांची नासधूस केली आहे. सुमारे आठ ते दहा हजार नागरिकांची वस्ती असलेल्या आनंद नगर झोपडपट्टीमध्ये आतापर्यंत दिडशे पेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्यानं हा परिसर हॉटस्पॉट म्हणून घोषित करून प्रतिबंधित करण्यात आला होता. सुरवातीच्या काळात या परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केलं. मात्र, मगापालिका प्रशासन केवळ आपल्याला डांबून ठेवत असून कोणत्याही सुविधा पुरवत नसल्याचा आरोप करत या आधीही हे नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. खरंतर, या नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, आज दुपारी पुन्हा हे नागरिक आणि खासकरून महिला मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्या. अनलॉक 5.0 सुरू झाल्यानं आम्हालाही बाहेर पडू द्या, सगळ्या तपासण्या करून कामावर जाऊ द्या आणि मूलभूत सुविधा पुरावा अशी त्यांची मागणी होती. मुंबईत धक्कादायक प्रकार, डॉक्टर फिरकले नाहीत म्हणून 16 तास मृतदेह घरात पडून एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर आल्यानं पोलिसांनी आधी त्यांना घरात परत जाण्याची विनंती केली. नागरिकही सहकार्याची भूमिका ठेऊन पोलिसांच म्हणणं एकूण घेत होते. मात्र, अचानक पोलिसांची ज्यादा कुमक आली आणि त्यांनी बळाचा वापर केला. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या सौम्य लाठीचार्जमध्ये एक स्थानिक तरुण किरकोळ जखमी झाला. ही बाब आंदोलनकर्त्या नागरिकांच्या लक्षात आली आणि त्यांनी आपला संताप व्यक्त करण्यासाठी पोलिसांवर दगडफेक केली. गर्लफ्रेंडसोबत घेतला PORN रिव्हेंज, चक्क Paytm वरून विकले अश्लील व्हिडिओ दरम्यान, महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळेच हा प्रकार घडल्याच बोललं जातं आहे. हॉटस्पॉट बनलेल्या या झोपडपट्टीमधील कोरोना बाधित नागरिकांच्या कुटुंबियाबरोबरच इतर नागरिकांच्या उदरनिर्वाहसाठी महापालिकेने नियोजन करणं गरजेच होतं. ते न झाल्यामुळेच नागरिकांना रस्त्यावर उतरावं लागल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. सध्या आनंद नगर परिसरात मोठ्या प्रमाणत पोलीस बंदोबस्त तौनात करण्यात आला असून इथे तणावपूर्ण शांतात बघायला मिळते. या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तातडीने उपाय योजना करणार असल्यां म्हटलं आहे. देशावर आणखी एक धोका? दोन महिन्यांत 12व्यांदा जाणवले भूकंपाचे धक्के संपादन आणि संकलन - रेणुका धायबर
Published by:Renuka Dhaybar
First published:

Tags: Corona, Pimpri chichwad

पुढील बातम्या