नवी दिल्ली, 08 जून : कोरोना, चक्रीवादळ आणि आर्थिक चणचण अशी अनेक संकट सध्या देशावर आहेत. अशात राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सोमवारी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर 2.1 ऐवढी होती. तर दिल्ली ते गुरुग्राम सीमा असा भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या भूकंपातून कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान झालं नसल्याचं सांगण्यात येत आहे.
12 एप्रिलपासून दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवायला सुरुवात झाली. तेव्हापासून वेगवेगळ्या दिवसांवर देशाच्या वेगवेगळ्या भागात तब्बल 12 भूकंपाचे धक्के जाणावले आहेत. या सर्व परिस्थितीत तज्ज्ञांनी काळजी व्यक्त केली आहे. या भूकंपांच्या धक्क्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हे कोणत्याही मोठ्या धक्क्याचे संकेत असू शकतात असा इशार त्यांनी दिला आहे.
यासंबंधी भारत सरकारच्या नोंदणीप्रमाणे, भूकंपामुळे दिल्ली आणि एनसीआर (Delhi-NCR) तीव्रतेमध्ये झोन 4 मध्ये येतात. जिथे रिश्टर स्केलवर 8 तीव्रता असलेला भूकंप होण्याचीही शक्यता आहे. तर दिल्लीत अनियोजित असलेल्या तब्बल 60 टक्के इमारती 80 टक्के असुरक्षित आहेत. अशा परिस्थितीत जर तीव्र भूकंप झाला तर जीवित आणि मालमत्तेचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
दोन महिन्यांत आलेले भूकंपाचे धक्के
- 12 एप्रिल 2020: रिक्टर स्केलवर तीव्रता 3.5, केंद्र दिल्ली, खोली (depth) 8 किलोमीटर.
- 13 एप्रिल 2020: रिक्टर स्केलवर तीव्रता 2.7, केंद्र दिल्ली, खोली 5 किलोमीटर.
- 15 मे 2020: रिक्टर स्केलवर तीव्रता 2.2, केंद्र दिल्ली, खोली 22 किलोमीटर.
- 28 मे 2020: रिक्टर स्केलवर तीव्रता 2.5, केंद्र फरीदाबाद, खोली 10 किमी.
- 29 मे 2020: रिक्टर स्केलवर तीव्रता 2.9, केंद्र रोहतक, खोली 10 किलोमीटर.
- 29 मे 2020: रिक्टर स्केल पर तीव्रता 4.5, केंद्र रोहतक, खोली 15 किलोमीटर.
- 1 जून 2020: रिक्टर स्केलवर तीव्रता 3.0, केंद्र रोहतक, खोली 10 किलोमीटर.
- 1 जून 2020: रिक्टर स्केलवर तीव्रता 1.8, केंद्र रोहतक, खोली 5 किलोमीटर.
- 3 जून 2020: रिक्टर स्केलवर तीव्रता 3.0, केंद्र फरीदाबाद, खोली 4 किलोमीटर.
- 5 जून 2020: रिक्टर स्केलवर तीव्रता 4.1, केंद्र जमशेदपुर, खोली 16 किलोमीटर.
- 8 जून 2020: रिक्टर स्केलवर तीव्रता 2.1, केंद्र दिल्ली-गुडगाव बॉर्डर, खोली 18 किलोमीटर.
(National center for seismologyच्या नुसार)
पेट्रोलवर नको दारुवर कर वाढवा, मनसेने केली ठाकरे सरकारकडे मागणी
सिस्मिक झोन 4 मध्ये आहे दिल्ली
भूकंपाच्या धक्कांमुळे दिल्लीचा समावेळ सिस्मिक झोन 4 मध्ये झाला आहे. इथे भूकंपाचा धोका जास्त आहे. पूर्व आणि जुनी दिल्लीमध्ये अरुंद आणि दलदली जमीन असलेला भाग अधिक संवेदनशील असल्याचं मानलं जातं. या ठिकाणी धोका नेहमीच जास्त असतो.
भूकंपाच्या दुष्परिणामांना कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं दिल्ली क्षेत्राखालील मातीची तपासणी केली आहे. त्यानुसार कोणतं क्षेत्र सर्वात संवेदनशील आहे (Earthquake prone area) याचा अभ्यास करण्यात आला आहे. भूमिगत रचनांवरील अभ्यासाला भू-वैज्ञानिक सिस्मिक माइक्रोजोनेशन (Seismic microzonation) असं म्हणतात. यामुळे भूकंपासंबंधी कोणती क्षेत्रं सुरक्षित आणि धोकादायक आहेत याची माहिती मिळते. त्यानुसार, आधीच सुरक्षा ठेवायला मदत मिळते. दाट लोकवस्ती असलेल्या यमुनापारसह तीन क्षेत्र सर्वात धोकादायक असल्याचं दिल्लीच्या एका अहवालात स्पष्ट म्हटलं आहे. त्यामुळे या भागात सुरक्षेच्या दृष्टीने विचार करणं महत्त्वाचं आहे.
राजेश खन्नांच्या गाण्यावर स्वतःला रोखू शकल्या नाहीत डिंपल, पाहा डान्स Video
दिल्ली-एनसीआरमध्ये पृथ्वीच्या आत प्लेटो सक्रिय झाल्यामुळे ऊर्जा बाहेर येते. त्यामुळे वारंवार भूकंपाचे धक्के बसत असल्याचा अनेकांचा अंदाज आहे. यावरून तज्ञांमध्येही बराच वाद आहे. काहींचं मत आहे की, हे छोटे भूकंप मोठे भूकंप होण्याचं टाळत आहेत. तर, बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की, हे छोटे भूकंप मोठ्या धोक्याचे संकेत देत आहेत. त्यामुळे सर्वांना या भूकंपाच्या धक्क्यांतून सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
गेल्या 4 दिवसांत मुंबई-पुण्यात 20000 प्रवासी दाखल; परप्रांतीय परतीच्या मार्गावर?
संपादन - रेणुका धायबर मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.