Home /News /mumbai /

मुंबईत धक्कादायक प्रकार, डॉक्टर फिरकले नाहीत म्हणून 16 तास मृतदेह घरात पडून

मुंबईत धक्कादायक प्रकार, डॉक्टर फिरकले नाहीत म्हणून 16 तास मृतदेह घरात पडून

मृत्यू दाखला देण्यास कुणी डॉक्टर तयार नसल्यानं 16 तास मृतदेह घरीच ठेवला असल्याचं समोर आलं आहे.

    स्वाती लोखंडे, प्रतिनिधी मुंबई, 08 जून : कोरोनासारख्या जीवघेण्या महामारीने अनेकांची घरं उद्ध्वस्त केली. राज्यात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. अशात मुंबईत कोरोनासंदर्भात अनेक धक्कादायक प्रकार समोर आले. सगळी आरोग्यसेवा कोरोनाशी लढा देण्यात व्यस्त असताना एक मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत्यू दाखला देण्यास कुणी डॉक्टर तयार नसल्यानं 16 तास मृतदेह घरीच ठेवला असल्याचं समोर आलं आहे. राजावाडी रुग्णालयातही मृतदेह पाहून दाखला देण्यास नकार दिल्यानं कुटुंबाला मनस्ताप झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. अनेक खाजगी डॉक्टरांनीही दाखला देण्यास नकार दिल्याचं कुटुंबियांकडून सांगण्यात आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मधुकर जाधव (65 वर्षे) यांचा रविवारी रात्री मृत्यू झाला. गेले काही दिवसआधी घरीच पडल्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. पण रविवारी रात्री 11 वाजता राहत्या घरात त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला. त्यांच्या अशा अकाली जाण्यामुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली. गर्लफ्रेंडसोबत घेतला PORN रिव्हेंज, चक्क Paytm वरून विकले अश्लील व्हिडिओ कुटुंबाने रात्रीच खाजगी डॉक्टरांना फोन करून घटनेची माहिती दिली परंतू तरीही डॉक्टर तपासण्यासाठी आले नाही. सरकारी यंत्रणांना फोन केल्यानंतरही पालिकेकडे बोट दाखवण्यात आलं. अशात मृतदेह घेऊन जाण्यासाठी सगळ्यांनी टाळाटाळ केली आणि अखेर तब्बल 16 तास मृतदेह घरातच पडून राहिला. देशावर आणखी एक धोका? दोन महिन्यांत 12व्यांदा जाणवले भूकंपाचे धक्के संपादन - रेणुका धायबर
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या