जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंडसोबत घेतला PORN रिव्हेंज, चक्क Paytm वरून विकले अश्लील व्हिडिओ

ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंडसोबत घेतला PORN रिव्हेंज, चक्क Paytm वरून विकले अश्लील व्हिडिओ

ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंडसोबत घेतला PORN रिव्हेंज, चक्क Paytm वरून विकले अश्लील व्हिडिओ

रिव्हेंज पॉर्न प्रकरणात पोलिसांनी खूप मोठा खुलासा केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नोएडा (उत्तर प्रदेश), 08 जून : प्रेमप्रकरणातून अनेक हत्या, आत्महत्या आणि असे अनेक गुन्हे झाल्याच्या बातम्या तुम्ही पाहिल्याच असतील. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रिव्हेंज पॉर्न प्रकरणात पोलिसांनी खूप मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे हल्लीची तरुणाई किती धोक्यात आहे याचा अंदाज येतो. पोलिसांनी आरोपी तरुणाला पश्चिम बंगालमधून अटक केली. त्याने केलेल्या खुलाश्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण त्या मुलीचा बॉयफ्रेंड होता, जिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर तिचा बदला घेण्यासाठी तो तिचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत होता. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. खरंतर, 3 मार्च रोजी आपले अश्लील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडिया साइट्स फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि बर्‍याच पॉर्न साइट्सवर सतत अपलोड केले जात असल्याची तक्रार एका तरुणीनं नोएडा पोलिसांकडे केली होती. हे व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असल्याचंही तिने तक्रारीमध्ये म्हटलं होतं. इतकंच नाही तर गंभीर म्हणजे अनेक वेबसाइट्सवर पेटीएमच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडिओ विकले जात असल्याचंही तिने सांगितलं. देशावर आणखी एक धोका? दोन महिन्यांत 12व्यांदा जाणवले भूकंपाचे धक्के यानंतर प्रकरणात अधिक तपास करणाऱ्या नोएडा पोलिसांनी पश्चिम बंगालमधून एका आरोपीला अटक केली. त्याची चौकशी केली असता आरोपी पीडितेचा पहिला प्रियकर होता आणि 4 -5 वर्षांपासून या दोघांमध्ये संबंध होते. पण ब्रेकअपनंतर बदला घेण्यासाठी या तरूणाने मुलीचे अश्लील व्हिडिओ सोशल साइटवर शेअर केले अशी कबूली त्याने पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी सर्व साईटवरून हे व्हिडिओ काढून टाकले असून सध्या आरोपीला तुरूंगात पाठवण्यात आलं आहे. कोरोनावर आणखी एक प्रभावी औषध, 3 दिवसांतच रुग्णांना आराम; शास्त्रज्ञांचा दावा संपादन - रेणुका धायबर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात