मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुणे महापालिका उद्यापासूनच्या कडक Lockdownसाठी सज्ज, 16 दिवसांत दुप्पट बेड वाढवल्याची माहिती

पुणे महापालिका उद्यापासूनच्या कडक Lockdownसाठी सज्ज, 16 दिवसांत दुप्पट बेड वाढवल्याची माहिती

 पुणे महापालिका आयुक्तांनी शहरातल्या सद्यस्थितीचा आढावा घेतला आणि पुण्यात कोरोनाचा विस्फोट झाल्यामुळे शुक्रवारी संध्याकाळपासून कडक lockdown सुरू होईल, असंही सांगितलं. निर्बंध न पाळणाऱ्यांविरोधात कारवाईचे अधिकार पोलिसांना दिले आहेत.

पुणे महापालिका आयुक्तांनी शहरातल्या सद्यस्थितीचा आढावा घेतला आणि पुण्यात कोरोनाचा विस्फोट झाल्यामुळे शुक्रवारी संध्याकाळपासून कडक lockdown सुरू होईल, असंही सांगितलं. निर्बंध न पाळणाऱ्यांविरोधात कारवाईचे अधिकार पोलिसांना दिले आहेत.

पुणे महापालिका आयुक्तांनी शहरातल्या सद्यस्थितीचा आढावा घेतला आणि पुण्यात कोरोनाचा विस्फोट झाल्यामुळे शुक्रवारी संध्याकाळपासून कडक lockdown सुरू होईल, असंही सांगितलं. निर्बंध न पाळणाऱ्यांविरोधात कारवाईचे अधिकार पोलिसांना दिले आहेत.

पुढे वाचा ...

पुणे, 08 एप्रिल : पुण्यात कोरोनाच्या उद्रेकामुळं परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. रोज मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत असल्यानं (Coronavirus blast in Pune)आरोग्य व्यवस्था ढासळत चालल्याची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र संपूर्ण यंत्रणा परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळत असून आवश्यक त्या उपाययोजना केल्याची माहिती पुण्याचे मनपा आयुक्त विक्रम कुमार (Pune commissioner Vikram Kumar Press conference) यांनी पत्रकार परिषदेत दिली. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने बेडची गरज वाढली. पण आवश्यकतेनुसार वाढ करत असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Pune Covid-19 situation)

पुण्यात गेल्या दोन दिवसांत व्हेंटिलिटेरचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्याबाबत माहिती देताना आयुक्तांनी सांगितलं की, पुण्यात एकूण 550 व्हेंटिलेटर बेड पैकी फक्त 2 शिल्लक (Ventilator shortage in Pune) होते. मात्र, आर्मीकडून 20 व्हेंटिलेटर बेड आणि 20 आयसीयू बेड मिळणार असून पुढील चार दिवसांत 50 व्हेंटिलेटर बेड वाढवणार असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. ऑक्सिजन बेडचा विचार करता पुण्यात 400 ऑक्सिजन बेड शिल्लक असून त्यात आणखी 350 ऑक्सिजन बेड वाढवत असल्याचंही आयुक्त यावेळी म्हणाले.

पुण्यात कोरोनाची दुसरी लाट कधी आणि कशी सुरू झाली, याचा आढावा या पत्रकार परिषदेत घेण्यात आला.

----------------------------------------

पुण्याची परिस्थिती एका नजरेत:

पुण्यात कोरोना रुग्ण वाढायला सुरुवात 13 फेब्रुवारी

आजची स्थिती:

अॅक्टिव्ह रुग्ण - 46000 रुग्ण

त्यापैकी गंभीर लक्षणं नसलेले 39000

रुग्णालयात दाखल - 6650

त्यापैकी व्हेंटिलेटरवर 550 व्हेंटिलेटर आणि उरलेले ऑक्सिजनवर

-------------------------------------------

बेड वाढवणे सुरूच; 6 खासगी रुग्णालयं 100 टक्के कोरोनासाठी

पुण्यात खासगी, शासकीय आणि महापालिकेचे हॉस्पिटल असे एकूण 3500 बेड होते. हा आकडा 16 दिवसांत 7500 पर्यंत वाढवला असल्याचं त्यांनी सांगितलं. व्हेंटिलेटर बेडचा आकडाही 290 वरून 550 वर गेल्याचं ते म्हणाले. पुण्यातली स्थिती पाहता बुधवारी 6 खासगी रुग्णालयांना 100 टक्के कोरोना रुग्णालय घोषित करण्यात आलं. तसंच बिबेवडीत 120 बेडच ईएसआय हॉस्पिटल दोन दिवसांत कोरोनासाठी सुरू करणार असल्याचंही आयुक्तांनी सांगितलं.

वाचा - 'कोरोनामुळे कमी, लॉकडाऊनमुळे मरू...', पुणेकर व्यापाऱ्यांकडून निर्बंधांचा निषेध

पुण्यात फेब्रुवारीच्या मध्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. सध्या पुण्यात 46000 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यापैकी 39000 हजार रुग्णांना काहीही त्रास नाही. हे रुग्ण घरी किंवा विलगीकरणात आहेत. तर 6650 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

लसीकरण वाढवणार..

कोरोनाचा सामना करताना लसीकरण अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं ज्याठिकाणी 45 पेक्षा जास्त कर्मचारी काम करत असतील त्याठिकाणी जाऊन लसीकरण करण्याची योजना राबवणार असल्याचं आयुक्त म्हणाले. मनपाकडे 25 हजार लस डोस शिल्लक असून रोज 22 हजार लोकांना लसीकरण केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. महापालिकेला एकूण 5,97,000 डोस मिळाल्याची माहितीही त्यांनी दिली.

वाचा -या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढती, मग रुग्णालयातील बेड्स रिकामे का?

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मनपा प्रशासन कठोर पावलं उचलत आहे. कोविड नियमावलीनुसार अंमलबजावणीसाठी कारवाई केली जात आहे. 3 लाख 22 हजार लोकांवर मास्क न वापरल्या प्रकरणी कारवाई करत 15 कोटी रुपयाचा दंड वसूल करण्यात आला, असून ठिकठिकाणी तपासणी केली जात असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. शुक्रवारी संध्याकाळपासून कडक लॉकडाऊनला सुरुवात होत असून पोलिसांना कारवाईचे अधिकार दिल्याची माहितीही त्यांनी दिली.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Pune