मराठी बातम्या /बातम्या /पुणे /देशी पिस्तुलाची विक्री करणाऱ्या टोळीचा सापला रचून पर्दाफाश, पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई

देशी पिस्तुलाची विक्री करणाऱ्या टोळीचा सापला रचून पर्दाफाश, पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई

pistols selling gang Pune पिंपरी चिंचवड पोलिसांनी सापळा रचत या टोळीचा पर्दाफाश केला आहे. चाकण पोलिसांनी या कारवाईमध्ये 3 देशी पिस्तुल आणि 7 जीवंत काडतुसं जप्त केली आहेत.

pistols selling gang Pune पिंपरी चिंचवड पोलिसांनी सापळा रचत या टोळीचा पर्दाफाश केला आहे. चाकण पोलिसांनी या कारवाईमध्ये 3 देशी पिस्तुल आणि 7 जीवंत काडतुसं जप्त केली आहेत.

pistols selling gang Pune पिंपरी चिंचवड पोलिसांनी सापळा रचत या टोळीचा पर्दाफाश केला आहे. चाकण पोलिसांनी या कारवाईमध्ये 3 देशी पिस्तुल आणि 7 जीवंत काडतुसं जप्त केली आहेत.

पिंपरी-चिंचवड, 17 मे : लॉकडाऊनच्या (Lockdown) काळामध्ये अनेकांना रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोटा पाण्यासाठी काय करायचं असा प्रश्न समोर असताना गुन्हेगारी कृत्य (crime) करणाऱ्यांचे धंदे मात्र सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचं कारण म्हणजे पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) या कडक निर्बंध असलेल्या लॉकडाऊनच्या काळात कट्टे विकणाऱ्या एका टोळीचा सापळा रचत पर्दाफाश केला आहे.

(वाचा-काँग्रेस आमदाराच्या गर्लफ्रेंडची आत्महत्या; Suicide Note सापडल्यानंतर अडचणीत वाढ)

कोरोनाच्या संकटामध्ये सगळीकडं शांत वातवरण असतानाच काही गुन्हेगारी घडामोडीदेखिल केल्या जात आहेत. पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांना अशाच काही घडामोडींची खबरबात लागली होती. त्यावरून पिंपरी चिंचवड शहर परिसरात आणि त्याचबरोबर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये देशी कट्टे विकणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी सापळा रचत या टोळीचा पर्दाफाश केला आहे. चाकण पोलिसांनी या कारवाईमध्ये 3 देशी पिस्तुल आणि 7 जीवंत काडतुसं जप्त केली आहेत.

(वाचा-महिलेला बलात्कार झाल्याचं कळलंच नाही, म्हणाली- मला वाटलं तो...पोलीस चक्रावले!)

पोलिसांनी सापळा रचून केलेल्या या कारवाईमध्ये देशी पिस्तुलाची विक्री करणारे प्रमोद किसनराव भसके आणि त्याची खरेदी करण्यासाठी आलेल्या दत्तात्रय सूर्याजी कडूसकर यांच्या मुसक्या आवळल्या आहे. मात्र देशी पिस्तुलांची विक्री करणाऱ्या टोळीचा म्होरक्या असलेल्या अक्षय पाटील हा मात्र फरार होण्यात यशस्वी झाला. अक्षय गोविंद पाटील हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात 10 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या कारवाईनंतर पोलिसांना पकडण्यात आलेल्या आरोपींची चौकशी सुरू केली आहे. त्यावरून या प्रकरणाचा पुढील तपास आणि अक्षय पाटीलच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न पोलिस करणार आहेत. तसंच या व्यवहारातून खरेदी विक्री झालेल्या पिस्तुलांच्या मदतीनं कोणते गुन्हेगारी कृत्य होणार होते, याचाही शोध पोलिस घेत आहेत.

First published:

Tags: Crime news, Pimpri chinchawad police, Pune