Home /News /national /

काँग्रेस आमदाराच्या गर्लफ्रेंडची आत्महत्या; Suicide Note सापडल्यानंतर अडचणीत वाढ

काँग्रेस आमदाराच्या गर्लफ्रेंडची आत्महत्या; Suicide Note सापडल्यानंतर अडचणीत वाढ

MP Congress MLA Girlfriend Suicide पोलिसांनी सोनिया यांच्या आईला सुसाईड नोट दाखवली. तसंच हँडरायटिंग एक्सपर्टची मदतही घेतली जात आहे. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी लवकरच सर्वकाही स्पष्ट होईल असं म्हटलं आहे.

    भोपाळ, 17 मे : मध्यप्रदेशचे माजी वनमंत्री (MP Ex Minister) आणि गंधवानीचे काँग्रेस आमदार (Congress MLA) उमंग सिंघार (Umang Singhar) यांच्या गर्लफ्रेंडने आत्महत्या (Singhar Girlfriend Suicide) केल्यानंतर त्यांच्या अचडणी वाढण्याची शक्यता आहे. सिंगार यांची गर्लफ्रेंड सोनिया भारद्वाजने (Sonia Bharadwaj) रविवारी शाहपुरा येथील बंगल्यावर आत्महत्या (Suicide) केली. तिची सुसाईड नोटही (Suicide Note) मिळाली आहे. सोनिया आणि सिंघार लवकरच लग्न करणार होते, असंही तपासात समोर आलं आहे. एका मॅट्रिमोनिअल वेबसाईटद्वारे त्यांची ओळख झाली होती. पण लग्न कधी होणार हे ठरलं नव्हतं. सोनियानं पहिल्या पतीला सोडल्यानंतर दुसरं लग्न केलं होतं. पण तेही फार काळ टिकलं नाही, असं नातेवाईकांनी सांगितलं आहे. (वाचा-महिलेला बलात्कार झाल्याचं कळलंच नाही, म्हणाली- मला वाटलं तो...पोलीस चक्रावले!) घटनास्थळी पोलिसांना मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये सोनिया यांनी काही संकेत केले आहेत. मात्र कोणालाही थेट जबाबदार ठरवलेलं नाही. त्यामुळं पोलिस नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. सिंघार यांच्या अनुपस्थितीत सोनियाने आत्महत्या केली. त्यामुळं सोनियाच्या कुटुंबीयांच्या जबाबावर आता पुढील तपास अवलंबून असेल. सोनियाचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी तिचा मुलगा आणि आई सोमवारी आले होते. आमदार सिंघारही याठिकाणी पोहोचले. त्यांनी सोनियाच्या आई आणि मुलाशीही चर्चा केली. त्यानंतर सोनिया यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. पोलिसांनी सोनिया यांच्या आईला सुसाईड नोट दाखवली. तसंच हँडरायटिंग एक्सपर्टची मदतही घेतली जात आहे. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी लवकरच सर्वकाही स्पष्ट होईल असं म्हटलं आहे. (वाचा-मास्क परिधान करण्यास सांगितलेलं झोंबलं;पुण्यात पेट्रोल पंपावरील कामगाराला मारहाण) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया आणि आमदार सिंघार 2 वर्षांपासून संपर्कात होते. सिंघार अंबालाला गेल्याची माहिती मिळालेली नाही. पण सोनिया दोन वेळा अंबालाला आल्या होत्या. एका महिन्यापासून त्या भोपाळमध्ये त्यांच्याच बंगल्यावर थांबलेल्या होत्या. याप्रकरणी पोलिस सध्या सिंघार यांची चौकशी करत आहेत. पोलिसांसाठी या प्रकरणात सुसाईड नोट सर्वात महत्त्वाची आहे. आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणी पोलिस सिंघार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करू शकतात. त्यासाठी कुटुंबीयांचा जबाब महत्त्वाचा असणार आहे. सोनिया यांच्याबद्दल त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं की, त्यांची स्वप्नं मोठी होती. त्या कधीही स्वतःच्या जीवनात समाधानी नव्हत्या. पहिल्या पतीला सोडून त्यांनी दुसरं लग्न केलं. पण तेही काही दिवसांत मोडलं होतं. पण मुलावर त्यांचं खूप प्रेम होतं. अंबालाच्या बलदेव नगर परिसरात त्या आईबरोबर राहत होत्या. सोनिया यांचा मुलगा आर्यन शिमल्यात हॉटल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे. पतीशी वादानंतर सोनिया त्याच्या शिक्षणाचा भार उचलत होत्या.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Madhya pradesh, Suicide news

    पुढील बातम्या