जाहिरात
मराठी बातम्या / देश / महिलेला बलात्कार झाल्याचं कळलंच नाही, म्हणाली- मला वाटलं तो...पोलीस चक्रावले!

महिलेला बलात्कार झाल्याचं कळलंच नाही, म्हणाली- मला वाटलं तो...पोलीस चक्रावले!

महिलेला बलात्कार झाल्याचं कळलंच नाही, म्हणाली- मला वाटलं तो...पोलीस चक्रावले!

बलात्काराचं (Rape) एक वेगळच प्रकरण उघड झालं आहे. या प्रकरणातील पीडित महिला तिच्या नवऱ्यासोबत झोपली होती. त्यावेळी तिच्यावर बलात्कार झाल्याचं तिला समजलंच नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

रीवा (मध्य प्रदेश) 17 मे :  बलात्काराचं (Rape) एक वेगळच प्रकरण उघड झालं आहे. या प्रकरणातील पीडित महिला तिच्या नवऱ्यासोबत झोपली होती. त्यावेळी तिच्यावर बलात्कार झाल्याचं तिला समजलंच नाही. तिला हा प्रकार लक्षात येईपर्यंत आरोपी पळून गेला होता. आता पीडित महिलेच्या तक्रारीनंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या विचित्र प्रकारामुळे पोलीस चक्रावले आहेत. काय आहे प्रकरण? मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) रीवामध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला तिचा नवरा आणि पाच वर्षांच्या मुलासह एका झोपडीमध्ये राहते. शुक्रवारी रात्री हे सर्व जण झोपलेले असताना अंधाराचा फायदा घेत एक अज्ञात व्यक्ती झोपडीमध्ये शिरला. त्या व्यक्तीनं महिलेची शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या महिलेला ती व्यक्ती आपला नवरा असल्याचं पहिल्यांदा वाटलं. काही वेळानं नवरा दुसऱ्या बाजूला झोपल्याचं लक्षात येताच ती ओरडली. या महिलेचा आवाज ऐकून तिचा नवरा जागा झाला. त्यानं आरोपीला पकडलं देखील होतं. पण अंधाराचा फायदा घेत आरोपी त्याच्या तावडीतून निसटला. या घटनेच्या दोन दिवसानंतर महिलेनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. VIDEO: माजी कर्मचाऱ्यानेच आखला टोलनाका लुटण्याचा प्लॅन; मुंबईतील थरारक घटना सीसीटीव्हीत कैद पीडित महिला राहते त्या झोपडीची जागा अगदीच लहान आहे. त्यामुळे त्या झोपडीत दुसरा व्यक्ती शिरल्याचं बाजूलाच झोपलेल्या नवऱ्याला कसं समजलं नाही? हा प्रश्न पोलिसांना पडला आहे. महिलेनं एका व्यक्तीवर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे, त्या व्यक्तीचं तिच्या नवऱ्याशी जुनं भांडण आहे. ती संशयित व्यक्ती देखील सध्या फरार आहे. या प्रकरणात सर्व बाजूंनी तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात