मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'महेंद्रसिंह धोनी स्वत: CSK पासून दूर होणार', 'या' क्रिकेटपटूचा दावा

'महेंद्रसिंह धोनी स्वत: CSK पासून दूर होणार', 'या' क्रिकेटपटूचा दावा

पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये (IPL 2022) खेळाडूंचे मेगा ऑक्शन (Mega Auction) होणार असून आणखी 2 टीम सहभागी होण्याची शक्यता आहे. मेगा ऑक्शन आणि दोन नव्या टीम यामुळे आयपीएलमध्ये सध्या असलेल्या आठही टीमचं चित्र बदलणार आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 27 मे : आयपीएलच्या या सिझनमधील (IPL 2021) 31 मॅच आणखी बाकी आहेत. त्याचवेळी पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल सिझनचे (IPL 2022) वेध लागले आहेत. पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये खेळाडूंचे मेगा ऑक्शन (Mega Auction) होणार असून  आणखी 2 टीम सहभागी होण्याची शक्यता आहे. मेगा ऑक्शन आणि दोन नव्या टीम यामुळे आयपीएलमध्ये सध्या असलेल्या आठही टीमचं चित्र बदलणार आहे. यामध्ये सर्वात मोठा बदल हा तीन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) मध्ये होण्याची शक्यता आहे.

टीम इंडियाचा माजी बॅट्समन आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने या पुढील वर्षी होणाऱ्या मेगा ऑक्शनबद्दलचा अंदाज व्यक्त केला आहे. चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) स्वत:च 'टीम मॅनेजमेंटला मला मुक्त करा' अशी विनंती करेल, असा अंदाज आकाश चोप्रा याने व्यक्त केला आहे.

धोनी का करणार विनंती?

महेंद्रसिंह धोनी हा सीएसकेचा मुख्य चेहरा आहे. पहिल्या आयपीएल सिझनपासून धोनी हाच सीएसकेचा कॅप्टन आहे. धोनीच्या कॅप्टनसीमध्येच सीएसके ही आयपीएलमधील यशस्वी टीम बनली. पुढील ऑक्शनमध्येही सीएसके धोनीच्या वयाचा विचार न करता त्याला कायम ठेवेल, असं चोप्राने सांगितले. मात्र धोनी स्वत:च टीम मॅनेजमेंटला त्याला कायम न करण्याची विनंती करेल असे चोप्राला वाटते.  पुढील तीन वर्ष धोनीमध्ये सीएसकेने गुंतवणूक करु नये, म्हणून तो ही विनंती करण्याची शक्यता आहे, असे चोप्रा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले आहे.

आकाश चोप्रा यांचा हा अंदाज खरा ठरला तर 2008 नंतर पहिल्यांदाच आयपीएलच्या ऑक्शनमध्ये महेंद्रसिंह धोनीचे नाव असेल. धोनीला खरेदी करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स तर प्रयत्न करणार हे नक्की आहे. पण, त्याचबरोबर अन्य आयपीएल फ्रँचायझींनाही  सीएसकेपेक्षा अधिक बोली लावून धोनीला टीममध्ये घेण्याची संधी मिळणार आहे.

IPL साठी 'या' देशातही होणार T20 वर्ल्ड कप, ICC ची खास योजना

पुढील वर्षात नियमांमध्ये बदल

यापूर्वी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये बीसीसीआयमे आयपीएल फ्रँचायझींना तीन खेळाडू रिटेन करण्याची आणि दोन खेळाडूंसाठी आरटीएम (Right to Match) कार्ड वापरण्याची संधी दिली होती. पुढील वर्षी 10 टीम असल्याने या नियमात बदल करुन बीसीसीआय फक्त 3 खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी आयपीएल फ्रँचायझींना देईल अशी शक्यता चोप्रा यांनी व्यक्त केली आहे.  या परिस्थितीमध्ये सीएसके महेंद्रसिंह धोनी, रविंद्र जडेजा आणि दीपक चहर या तीन खेळाडूंना पसंती देईल असे चोप्रा यांनी सांगितले.

First published:

Tags: Cricket news, Csk, Ipl, MS Dhoni