मराठी बातम्या /बातम्या /kolhapur /

माथेरान नगरपालिकेत शिवसेनेला मोठा धक्का, 10 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

माथेरान नगरपालिकेत शिवसेनेला मोठा धक्का, 10 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

माथेरान नगरपालिकेमध्ये भाजपने राजकीय सर्जिकल स्ट्राईक करत सेनेला दणका दिला आहे.

माथेरान नगरपालिकेमध्ये भाजपने राजकीय सर्जिकल स्ट्राईक करत सेनेला दणका दिला आहे.

माथेरान नगरपालिकेमध्ये भाजपने राजकीय सर्जिकल स्ट्राईक करत सेनेला दणका दिला आहे.

कोल्हापूर, 27 मे : माथेरान नगरपालिकेमध्ये (matheran nagar palika) भाजपने (BJP) शिवसेनेला (Shivsena) जोरदार धक्का दिला आहे. शिवसेनेचे 10 नगरसेवक (Corporators)भाजपच्या गळाला लागले असून पक्षप्रवेश केला आहे. माथेरानमध्ये शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

एकीकडे जळगावमध्ये भाजपच्या गडाला सुरुंग लागला आहे तर दुसरीकडे माथेरान नगरपालिकेमध्ये भाजपने राजकीय सर्जिकल स्ट्राईक करत सेनेला दणका दिला आहे. माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली माथेरान नगरपालिकेतील शिवसेनेचे 10 नगरसेवक फोडण्यात यश आले आहे. या सर्व 10 नगरसेवकांना कोल्हापूरमध्ये हलवण्यात आले. आज सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या 10 नगरसेवकांचा प्रवेश सुद्धा पार पडला.

मराठमोळ्या सई लोकूरचा साउथ इंडियन तडका, डान्सचा धम्माल VIDEO VIRAL

माथेरान नगरपालिकेत 17 पैकी 14 नगरसेवक हे शिवसेनेचे होते. त्यातील 10 नगरसेवक भाजपच्या गळाला लागले आहे. त्यामुळे शिवसेनेकडे फक्त 4 चं नगरसेवक उरले आहे. त्यामुळे माथेरान नगरपालिकेत सेना अडचणीत सापडली आहे.

या दहा शिवसैनिकांनी केला भाजपमध्ये प्रवेश

1) आकाश चौधरी, उपनगराध्यक्ष

2) राकेश चौधरी, नगरसेवक

3) सोनम दाबेकर, नगरसेवक

4) प्रतिभा घावरे, नगरसेवक

5) सुषमा जाधव, नगरसेवक

6) प्रियांका कदम, नगरसेवक

7) ज्योती सोनवळे, नगरसेवक

8) संदीप कदम, नगरसेवक

9) चंद्रकांत जाधव, नगरसेवक

10) रुपाली आखाडे, नगरसेवक

जळगावात भाजपचे 7 नगरसेवक शिवसेनेत!

दरम्यान, जळगावातील मुक्ताई नगरपालिकेचे (Muktai Nagar Palika) 7 नगरसेवक शिवबंधनात अडकले आहे. बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (CM Uddhav Thackeray) वर्षा निवास्थानी हे सर्वच्या सर्व 7 नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले. जळगाव महानगरपालिकेनंतर आता मुक्ताई नगरपालिकेतील नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने भाजपला हा एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.

तरुणीवर गँगरेप, युवतीनेही दिली साथ; VIRAL VIDEOनंतर मंंत्र्यांची अशी प्रतिक्रिया

मुक्ताई नगरपालिकेचे 7 नगरसेवक हे गुलाबराव पाटील यांच्यासह वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या नगरसेवकांनी आपल्या हातावर शिवबंधन बांधत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. सहा नगरसेवक हे भाजपचे असून एक नगरसेवक अपक्ष आहे.

First published: