जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Laxman Jagtap : ...आणि लक्ष्मण जगताप यांना पाहून फडणवीस झाले होते स्तब्ध

Laxman Jagtap : ...आणि लक्ष्मण जगताप यांना पाहून फडणवीस झाले होते स्तब्ध

 मे महिन्यात विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. यावेळी लक्ष्मण जगताप आजारी असल्याने रुग्णवाहिकेतून विधान भवनात आले होते.

मे महिन्यात विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. यावेळी लक्ष्मण जगताप आजारी असल्याने रुग्णवाहिकेतून विधान भवनात आले होते.

मे महिन्यात विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. यावेळी लक्ष्मण जगताप आजारी असल्याने रुग्णवाहिकेतून विधान भवनात आले होते.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 03 जानेवारी :  पक्षनिष्ठा काय असते याचे उत्तम उदाहरण हे मे महिन्यात राष्ट्रपती आणि विधान परिषद निवडणुकीच्या काळात पाहण्यास मिळाले. भाजपचे आमदार  लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांची प्रकृती नाजूक असताना रुग्णवाहिकेनं विधिमंडळात पोहोचले होते. त्यावेळी दोन्ही आमदारांना पाहून भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्तब्ध झाले होते. चिंचवड विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांची प्रकृती ही अत्यंत नाजूक होती.

जाहिरात

त्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं. पण उपचारादरम्यान आज त्यांचं निधन झालं.  त्यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

News18लोकमत
News18लोकमत

विशेष म्हणजे,  मे महिन्यात विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. यावेळी पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप आजारी असल्याने रुग्णवाहिकेतून विधान भवनात आले होते. त्यानंतर पीपीई कीट घालून ते मतदानाला गेले होते. लक्ष्मण जगताप जेव्हा  विधान भवनाच्या गेटवर पोहोचले तेव्हा खुद्द देवेंद्र फडणवीस हे त्यांना घेण्यास पोहोचले होते. (‘अण्णाजी पंत’ तारतम्य बाळगा आणि आधी…,शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांना सुनावलं) कोरोनाचा संसर्ग आणि त्यांची प्रकृती पाहता पीपीई कीट घालून लक्ष्मण जगताप हे मतदानाला पोहोचले होते. त्यांची प्रकृती पाहता अशाही परिस्थितीत ते मतदानाला आल्याचे पाहून फडणवीस आणि इतर भाजपचे नेते स्तब्ध झाले होते. (  भाजप अध्यक्षांसमोर फक्त 30 सेकंदांचं भाषण, नाराजीच्या चर्चांवर पंकजा मुंडे म्हणाल्या… ) पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील विकासामध्ये लक्ष्मण जगताप यांचे मोलाचे योगदान आहे.. पक्षाशी त्यांची घनिष्ठ निष्ठा होती आजारी असतानाही पीपीई घालून ते मतदानाला आले होते. विकासासंदर्भात त्यांची एक वेगळी दृष्टी होती. त्यांच्या जाण्याने मोठे नुकसान झाले आहे. खरं पाहिलं तर ते खूप फिट होते. मात्र आजारपणामुळे त्यांची प्रकृती खालवली, असं म्हणत फडणवीस यांनी जगताप यांना श्रद्धांजली अर्पण केली. ‘लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात दिलेले योगदान कायम लक्षात राहील. मतदारसंघाचा विकास हाच ध्यास घेऊन त्यांनी काम केले. वाढत्या शहरीकरणात वंचित व उपेक्षित घटकांच्या हिताला बाधा न पोहचता विकास झाला पाहिजे यासाठी ते आग्रही होते. आपल्या आजारपणातही त्यांनी राज्यसभेसाठी मतदान करून राज्याचा आवाज संसदेत वाढला पाहिजे, यासाठी आग्रह धरला. मी त्यांना मतदानात भाग घेऊ नका, आपली तब्येत सांभाळा असे सांगूनही त्यांनी आपली कर्तव्यनिष्ठा दाखवली होती. विधानभवनात पीपीई कीट घालून त्यांचे मतदानाला येणे आणि त्यावेळी अत्यंत प्रेमाने मला दिलेली हाक मी कधीच विसरू शकणार नाही. मध्यंतरी प्रकृती सुधारत असताना ते आपल्यात पुन्हा परतणार, असा ठाम विश्वास होता. पण आज ही वाईट बातमी आली. या दुःखद प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत’ अशी भावनाही फडणवीसांनी व्यक्त केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात