सातारा, 31 मे: थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर येथे एका कोरोनाबाधित रुग्णानं आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे ही घटना क्वारंनटाईन सेंटरमध्ये घडली आहे.
हेही वाचा...मोठी बातमी! आमदार रवी राणांविरुद्ध गुन्हा दाखल, वाचा काय आहे प्रकरण?
महाबळेश्वर येथे MTDC च्या क्वारंटाईन सेंटकमध्ये एकाने शनिवारी सायंकाळी बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी ग्राणीण रुग्णालयात रवाना केला आहे. रुग्णाच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही.
दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णानं आत्महत्या केल्याची एका दिवसातली ही दुसरी घटना आहे. चंद्रपूर शहरातील बल्लारपूर बायपास मार्गावरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संस्थात्मक क्वारंटाईन सेंटरमध्ये एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली तर याच सेंटरमध्ये एका व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. दोघेही 22 आणि 23 मेपासून क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल झाले होते.
मिळालेली माहिती अशी की, 40 वर्षीय व्यक्ती अभियांत्रिकी महाविद्यालयात एक फ्लॅटमध्ये स्वतंत्र खोलीत होता. त्याने कपडे वाळत टाकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन महिन्यांपासून तो बेपत्ता होता. कुटुंबाने तशी तक्रार केली होती. नागपूर येथून आल्यानंतर तो मानसिक तणावात होता. यातूनच त्याने आत्महत्या केली. तर 48 वर्षीय व्यक्तीला सकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. सदर व्यक्ती मध्य प्रदेशातून आली होती. म्हणून त्यांना विलगीकरणात ठेवलं होतं. या व्यक्तीला क्षयरोग झाला होता. मागील चार वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. यामुळे ते तणावात होते. दोघांचे नमुने घेतले असून करोना तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
हेही वाचा.. मुंबईत अवघ्या दीड-दोन तासांत 7 रुग्णांचा मृत्यू, नर्सनं दिली धक्कादायक माहिती