मुंबई, 31 मे: मुंबईसह उपनगरात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. जोगेश्वरी येथील हॉस्पिटलमध्ये शनिवार अवघ्या 2 तासांत 7 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील बहुतांश हॉस्पिटलमध्ये हाहाकार उडाला आहे. सर्व रुग्णांचा मृत्यू आयसीयूमध्ये ऑक्सिजन लेव्हल (Low Oxygen) कमी झाल्यामुळे झाला, अशी धक्कादायक माहिती एका नर्सनं दिली आहे. हेही वाचा.. दिलासा! अंतीम वर्षाच्या परीक्षा रद्द होणार, उच्चशिक्षण मंत्र्यांचा मोठा खुलासा नर्सनं नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिलेली माहिती अशी की, आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदार पणामुळे गेल्या एका आठवड्यात जोगेश्वरी येथील हॉस्पिटलमध्ये 12 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. येथे वरिष्ठ डॉक्टरांची कमतरता असल्यानं रुग्णांवर योग्य उपचार घेतले जात नाहीत. ‘अशी स्थिती याआधी पाहिली नाही’ ‘मुंबई मिरर’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ही घटना शनिवारची आहे. नर्सने सांगितलं की, अशी स्थिती याआधी कधीच पाहिली नाही. अवघ्या दीड-दोन तासांत डोळ्यादेखत 7 रुग्णांचा मृत्यू झाला. इंडिकेटरमध्ये दिसत होतं की, ऑक्सिजन लेव्हल कमी झाली आहे. रुग्णांना श्वास घेण्यास मोठी समस्या होत होती. आम्ही काही करण्याच्या आत एक पाठोपाठ एक अशा सात जणांचा मृत्यू झाला. व्यवस्थापनाने आरोप फेटाळले.. रिपोर्टनुसार, आयसीयूमध्ये ऑक्सिजन लेव्हल कमी झाली असून रुग्णांना मोठा धोका असल्याची माहिती डॉक्टरांना देण्यात आली होती. परंतु, आयसीयूमध्ये टेक्निशियन पोहोचण्याआधीच 7 रुग्णांनी आपले प्राण सोडले होते. नंतर हॉस्पिटलमध्ये एकच खळबळ उडाली. मेडिकल सुपरिन्टेन्डेन्ट डॉ. माने यांनी पहाटे 4 वाजता इमरजन्सी मीटिंग बोलावली. आयसीयूमध्ये ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा वृत्त डॉ. माने यांनी फेटाळले आहे. 24 तासांत 8000 हून अधिक नवे रुग्ण देशात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) नवीन रुग्णांनी पुन्हा एकदा सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry) आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 8380 नवीन रुग्ण आढळले आणि 193 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवीन प्रकरणे दाखल झाल्यानंतर देशात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या 1 लाख 82 हजार 142 झाली आहे. शुक्रवारी कोरोनाचे 7964 नवीन रुग्ण आढळले तर 265 रुग्णांचा मृत्यू झाला. देशात सध्या कोरोनाचे 89995 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोना साथीच्या आजारामुळे आतापर्यंत 5164 रुग्णांचा मृत्यू झाला असून 86983 लोक बरे झाले आहेत. कोरोना विषाणूचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात झाला आहे. महाराष्ट्रात एका दिवसात 2,940 नवीन रुग्ण समोर आले आहेत तर 99 लोकांचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्ण आल्यानंतर राज्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 65,168 वर पोहोचली आहे. हेही वाचा.. पुण्यातून मोठी दिलासादायक बातमी, 4799 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन गेले घरी देशात कोव्हिड-19 मुळे मृत्यूच्या एकूण 5164 घटनांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 2,197 घटना घडल्या आहेत. त्यानंतर गुजरातमध्ये 1007, मध्य प्रदेशात 343, दिल्लीत 416, पश्चिम बंगालमध्ये 309, उत्तर प्रदेशात 201 आहेत. राजस्थानमध्ये 193, तामिळनाडूमध्ये 160, तेलंगणात 77 आणि आंध्र प्रदेशात 60 प्रकरणं नोंदवली गेली आहेत. कर्नाटकात संक्रमणामुळे आतापर्यंत 48 जणांचा मृत्यू झाला आहे, पंजाबमध्ये 44 तर जम्मू काश्मीरमध्ये 28 जणांचा मृत्यू झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.