मोठी बातमी! आमदार रवी राणांविरुद्ध गुन्हा दाखल, वाचा काय आहे प्रकरण?

मोठी बातमी! आमदार रवी राणांविरुद्ध गुन्हा दाखल, वाचा काय आहे प्रकरण?

बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध राजापेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:

अमरावती, 31 मे: बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध राजापेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संचारबंदी लागू असताना शासनाची कुठल्याही परवानगी न घेता अमरावती शहरातील राजापेठ येथील रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपूलाचे उद्घाटन केल्याप्रकरणी आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध राजापेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा...मुंबईत अवघ्या दीड-दोन तासांत 7 रुग्णांचा मृत्यू, नर्सनं दिली धक्कादायक माहिती

आमदार रवी राणा यांनी शनिवारी सकाळी बेकायदेशीररित्या उड्डानपुलाचे उद्घाटन केले होते. त्यासाठी आमदार रवी राणा यांनी ऑटो रिक्षा आणि 15 ते 20 कार्यकर्ते जमवले होते.

राजापेठ पोलिस स्टेशनमधील सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मेहेत्रे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आमदार रवी राणा यांच्यासह कार्यकर्ते आणि ऑटोरिक्षाचालकांविरुद्ध शनिवारी रात्री आपत्ती व्यवस्थापन कायदा उल्लंघन केल्याप्रकरणी भादंवि कलम 188, 269 नुसार संचारबंदी, साथरोग कायद्याचे उल्लंघन प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

खासदार नवनीत राणांनी कापले नवऱ्याचे केस...

दुसरीकडे, कोरोनाने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात सलून बंद आहेत. यामुळे नागरिकांची मोठी गोची झाली आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पती आमदार रवी राणा यांचे घरीच केस कापल्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हेही वाचा.. भाजपच्या मोठ्या नेत्याचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले...

खासदार नवनीत राणा यांनी हा व्हिडिओ शेअर करताना, 'आत्मनिर्भर होण्याचा अनोखा प्रयत्न' म्हणत ही पोस्ट शेअर केली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी आपापल्या घरीच केस कापले आहेत. मात्र नवीनत राणा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

First published: May 31, 2020, 2:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading