मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, नव्या आकडेवारीने बदलले शहराचे चित्र, पाहा हा आलेख

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, नव्या आकडेवारीने बदलले शहराचे चित्र, पाहा हा आलेख

सतत वाढणारी रुग्णांची संख्या आणि कोरोनाच्या बळींचा आकडा यामुळे पुण्यात चिंतेचं वातावरण होतं. पण, आता पुणेकरांची लवकरच यातून सुटका होण्याची चिन्ह आहे.

  • Published by:  sachin Salve

पुणे, 18 ऑगस्ट : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. पण, आता नवीन आलेल्या आकडेवारीनुसार, पुण्याचे चित्र कमालीचे बदलले आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून पुणे जिल्ह्याला कोरोनाचा विळखा बसला आहे. सतत वाढणारी रुग्णांची संख्या आणि कोरोनाच्या बळींचा आकडा यामुळे पुण्यात चिंतेचं वातावरण होतं. पण, आता पुणेकरांची लवकरच यातून सुटका होण्याची चिन्ह आहे.

17 ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार, पुण्यात आता 19 टक्के अ‍ॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण संख्या राहिली आहे.  गेल्या 10 दिवसांमध्ये पुण्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची टक्केवारी कमी झाली आहे.

10 दिवसांपूर्वी म्हणजे, 7 ऑगस्ट रोजी हीच टक्केवारी 27 टक्क्यांवर होती. ती आता 19 टक्क्यांवर आली आहे. एकूण 8 टक्के रुग्ण संख्या कमी झाली आहे. याआधी हाच दर 11 ऑगस्ट रोजी सर्वात कमी झाला होता. त्यानंतर आता अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची कमी होण्याची संख्या आता कमी कमी होत चालली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीच ही माहिती जाहीर केली आहे.

साहेब, तुमचा वाघ गेला हो! अन् राज ठाकरे झाले स्तब्ध, कॉल रेकॉर्डचा VIDEO व्हायरल

शहरात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही नव्या रुग्णांपेक्षा जास्त आहे. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे, हे दिलासादायक चित्र आहे, त्यामुळे पुणे लवकरच कोरोनातून मुक्त होईल, असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला.

घरात घुसणे जीवावर बेतले, नागरिकांनी केलेल्या मारहाणीत चोराचा मृत्यू

पुण्यात आतापर्यंत 3 लाख 64 हजार 444 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यात  74 हजार 933 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. आतापर्यंत  आतापर्यंत 58 हजार 706 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आता शहरातील कोरोनामुक्तांचे प्रमाण 78.34 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.  पुण्यात सध्या  14 हजार 442 कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहे.तर संपूर्ण शहरात कोरोनामुळे 1 हजार 785 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

First published:

Tags: पुणे