Home /News /pune /

ठाण्यात आणि पुण्यात उघडलेले मॉल्स आणि थिएटर्स पुन्हा बंद, दुकानं आणि रेस्टॉरंटचं शटर लवकर होणार डाउन, पाहा नवीन निर्बंध

ठाण्यात आणि पुण्यात उघडलेले मॉल्स आणि थिएटर्स पुन्हा बंद, दुकानं आणि रेस्टॉरंटचं शटर लवकर होणार डाउन, पाहा नवीन निर्बंध

New Unlock Guidelines: यापुढे पहिल्या आणि दुसऱ्या वर्गात मोडणाऱ्या महापालिका आणि जिल्ह्यांना सध्या तिसऱ्या वर्गासाठी असलेले नियम लागू होणार आहेत. त्यामुळे मॉल्सवर पुन्हा येणार निर्बंध

मुंबई, 25 जून : महाराष्ट्रात (Maharashtra coronavirus Updates ) कोरोनाची दुसरी लाट (Second wave of corona ) ओसरत असताना मुंबई आणि पुण्यासह शहरी भागातील मॉल्स आणि थिएटर्स (restrictions Malls and Theaters) आता कुठे सुरू झाले होते. घटत चाललेला कोरोना पॉझिटिव्हीटी दर (Positivity rate) आणि वाढत चाललेली ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता (Oxygen Beds) यामुळे शहरांतील निर्बंध शिथिल होत आहेत. विशेषतः पहिल्या आणि दुसऱ्या वर्गात मोडणाऱ्या शहरांमध्ये तर रात्रीपर्यंत मॉल आणि थिएटर सुरु झाले आहेत. पण आता पुन्हा त्यांचं शटर डाऊन होणार आहे. ऩव्या डेल्टा व्हेरिअंटची (Delta Variant) दहशत आणि संभाव्य तिसऱ्या लाटेची भीती या पार्श्वभूमीवर सरकारनं नवे निर्बंध (New guidelines of Lockdown restrictions Maharashtra) जाहीर केले आहेत. त्यामुळे यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या पाचपैकी पहिले दोन वर्ग रद्द करत असल्याचं सरकारी आदेशात नमूद करण्यात आलंय. यापुढे पहिल्या आणि दुसऱ्या वर्गात मोडणाऱ्या महापालिका आणि जिल्ह्यांना सध्या तिसऱ्या वर्गासाठी असलेले नियम लागू होणार आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी या उपाययोजना गरजेच्या असल्या तरी त्यामुळे तरुणाईचा मात्र हिरमोड झाला आहे. मॉल का उघडणार नाहीत? यापूर्वी राज्य सरकारनं जाहीर केलेल्या धोरणानुसार पहिल्या आणि दुसऱ्या वर्गात मोडणाऱ्या जिल्ह्यांत आणि महापालिका क्षेत्रात मॉल्स आणि थिएटर्स सुरू करायला परवानगी दिली होती. मात्र तिसऱ्या वर्गासाठी ही परवानगी नव्हती. आता एखादं महानगर किंवा जिल्हा अगदी पहिल्या वर्गात  जरी मोडत असेल, तरी सध्या तिसऱ्या वर्गासाठी असलेले नियमच लागू होणार आहेत. तिसऱ्या वर्गात मॉल आणि थिएटर्सना मनाई आहे. त्यामुळे शहरातील कोरोना पॉझिटीव्हीटी दर किती कमी झाला आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता कितीही वाढली, तरी मॉलमध्ये फिरायला जाण्याचं किंवा थिएटरमध्ये सिनेमा पाहायला जाण्याचं स्वप्न आणखी काही काळ गुंडाळूनच ठेवावं लागणार आहे. हे वाचा -बनावट लसीकरणाच्या तपासासाठी विशेष पथकाची स्थापना; मुख्य आरोपीचं बँक खातं गोठवलं 4 वाजता शटर डाऊन रेस्टॉरंट आणि इतर दुकानं सुरु राहतील, पण तीदेखील जास्तीत जास्त दुपारी 4 वाजेपर्यंत. म्हणजे कोरोना रुग्णांची संख्या सर्वात कमी असलेलं शहर असेल, तरीदेखील जास्तीत जास्त 4 वाजेपर्यंतच रेस्टॉरंट्स सुरू राहणार आहेत. त्यामुळे ज्यांचे पार्टी करण्याचे किंवा सहभोजनाला जाण्याचे बेत आहेत, त्यांना दुपारी 4 वाजण्याच्या आत खाऊनपिऊन बाहेर पडावं लागणार आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये दिसणारं चित्र आणि डेल्टा व्हायरसच्या प्रसाराचा वेग या बाबींचा विचार करून सरकार पुढील निर्णय घेणार आहे. तोपर्यंत तरी सर्वांना पुन्हा एकदा निर्बंधांसह कोरोनाचा सामना करण्यासाठी तयार राहावं लागणार आहे.
Published by:desk news
First published:

Tags: Coronavirus, Lockdown, Mumbai, Pune

पुढील बातम्या