Home /News /mumbai /

बनावट लसीकरणाच्या तपासाला वेग; विशेष पथकाची स्थापना, मुख्य आरोपीचं बँक खातं गोठवलं

बनावट लसीकरणाच्या तपासाला वेग; विशेष पथकाची स्थापना, मुख्य आरोपीचं बँक खातं गोठवलं

Crime in Mumbai: कांदिवली बनावट लसीकरण प्रकरणी पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. मुंबई पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली असून मुख्य आरोपीचं बँक खातं गोठवलं आहे.

    मुंबई, 25 जून: 30 मे 2021 रोजी मुंबईच्या (Mumbai) कांदिवली परिसरातील हिरानंदानी हेरिटेज सोसायटीत एका बनावट लसीकरण शिबीराचं (fake vaccination camp) आयोजन करण्यात आलं होतं. याठिकाणी अनेकांना बनावट लशी देण्यात आल्या होत्या. या बनावट लसीकरण प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण 10 जणांना अटक केली आहे. यातील 8 जण संशयित आरोपी आहेत. मुंबई पोलिसांनी कारवाई करत मुख्य आरोपीचं बँक खातं गोठवलं आहे. मुंबई पोलिसांकडून बनावट लसीकरण प्रकरणाच्या तपासाला वेग दिला आहे. यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली असून या पथकाचं नेतृत्व डीएसपी पदावरील अधिकाऱ्याकडून केलं जाणार आहे. बनावट लसीकरण शिबीर राबवल्याप्रकरणी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात आतापर्यंत 7 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित आरोपी आणखी 8 ठिकाणी अशाप्रकारच्या शिबीराचं आयोजन केल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी कारवाईला वेग दिला आहे. यामध्ये एका महिलेचा देखील समावेश असून संबंधित महिला Co-WIN App वर डेटा अपलोड करण्याचं काम करते. या महिलेची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. या चौकशीत मोठे खुलासे होण्याची शक्यता वरिष्ठ तपास अधिकाऱ्यांडून व्यक्त करण्यात आली आहे. हेही वाचा- कांदिवली बनावट लसीकरण प्रकरण; Co-WIN App वर डेटा अपलोड करणाऱ्या महिलेची चौकशी, होणार मोठे खुलासे गुडिया असं संबंधित महिलेचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. गुडिया ही नागरिकांच्या लसीकरणाचा डेटा Co-WIN App वर अपलोड करण्याच काम करत होती. त्याचबरोबर लसीकरणाचं प्रमाणपत्र जनरेट करण्याच कामही गुडिया करत होती. त्यामुळे कांदिवली पोलीस संबंधित महिलेची कसून चौकशी करत आहेत. या प्रकरणात आणखी कोण कोण गुंतले आहेत, याचा खुलासा या महिलेकडून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बनावट लसीकरणाचं मोठं रॅकेट उघड होऊ शकतं.

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona vaccine, Crime news, Fake, Mumbai

    पुढील बातम्या