नाट्यमय घडामोडी! राष्ट्रवादीची ऐनवेळी माघार, भाजपच्या गळ्यात उपमहापौरपदाची माळ

नाट्यमय घडामोडी! राष्ट्रवादीची ऐनवेळी माघार, भाजपच्या गळ्यात उपमहापौरपदाची माळ

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपमहापौरपदाच्या निवडणूक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाली.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 6 नोव्हेंबर: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपमहापौरपदाच्या (pimpri chinchwad municipal Corporation Deputy Election) निवडणूक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाली. सत्ताधारी भाजप (BJP)नेत्यांच्या मनधरणीनंतर उपमहापौरपदाची निवडणूक लढवणाऱ्या राष्ट्रवादीच्या (NCP) उमेदवार निकिता कदम यांनी ऐनवेळी माघार घेतली.

निकिता कदम यांनी माघार घेतल्यामुळे उपमहापौरपदी भाजपचे नगरसेवक केशव घोळवे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

हेही वाचा... इनकमिंग सुरूच! एकनाथ खडसेंसह 5 माजी आमदारांनी हाती घेतला राष्ट्रवादीचा झेंडा

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपमहापौर तुषार हिंगे यांनी गेल्या 14 ऑक्टोबरला तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक घेतण्यात आली. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणार खेमणार हे पीठासन अधिकारी होते. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध असल्याचं पीठासन अधिकाऱ्यांनी जाहीर केलं. माघार घेण्यासाठी उभय उमेदवारांनी 15 मिनिटांचा अवधी देण्यात आला. भाजप उमेदवार केशव घोळवे व सभागृह नेते नामदेव ढाके यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार निकिता कदम यांच्यासह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना माघार घेण्यासाठी विनंती केली. अर्ज माघार घेण्यासाठी अवघे चार मिनिटं शिल्लक असताना कदम यांनी माघार घेतली. त्यानंतर केशव घोळवे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली.

केशव घोळवे यांना उपमहापौरपदाची केवळ पाच महिन्यांसाठी संधी देण्यात आली आहे. पक्षांतर्गत वाद शमवण्यासाठी भाजपनं राष्ट्रवादीपुढे लोटांगण घातल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

उपमहापौरपदासाठी सत्ताधारी भाजपकडून नगरसेवक केशव घोळवे यांनी अर्ज दाखल केला. महापालिकेत भाजपची सत्ता असताना घोळवे यांची निवड निश्चित होती. मात्र, संख्याबळ नसताना राष्ट्रवादी काँग्रेसनं उपमहापौराच्या निवडणुकीत उडी घेतली. निकिता कदम यांनी अर्ज दाखल केला. मात्र, भाजपकडून निकिता कदम यांची मनधरणी करण्यात आली. कदम यांनी ऐनवेळी मागे घेतला. त्यामुळे केशव घोळवे यांची बिनविरोध निवड झाली.

सोशल डिस्टंसिंगचा फज्जा...

पिंपरी चिंचवड-उपमहापौरपदी भाजप नगरसेवक केशव घोळवे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर महापालिकेच्या मुख्य इमारतीत समर्थकांनी एकच गर्दी केली. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा चांगलाच फज्जा उडाला.

हेही वाचा...भाजप अध्यात्मिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष तुषार भोसलेंसह 9 जणांवर गुन्हा

पाकीटमारांचा पकडलं...

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारतीत उपमहापौरपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू असतांना दोन पाकीटमारांना रंगेहात पकडण्यात आलं. भामट्यांना चांगलाच चोप देण्यात आला. अनेकांचे पाकीट मारणाऱ्या दोघांना रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: November 6, 2020, 1:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading