जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / भाजप अध्यात्मिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष तुषार भोसलेंसह 9 जणांवर गुन्हा

भाजप अध्यात्मिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष तुषार भोसलेंसह 9 जणांवर गुन्हा

भाजप अध्यात्मिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष तुषार भोसलेंसह 9 जणांवर गुन्हा

‘दार उघड उद्धवा, दार उघड’ म्हणत राज्यातील मंदिरं सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजप आध्यात्मिक आघाडीचं पुन्हा एकदा आंदोलन

  • -MIN READ
  • Last Updated :

उस्मानाबाद, 6 नोव्हेंबर: ‘दार उघड उद्धवा, दार उघड’ म्हणत राज्यातील मंदिरं सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजप आध्यात्मिक आघाडीनं पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं आहे. तुळजाभवानी मंदिर परिसरात भाजप आध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांच्या नेतृत्वात बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे, पोलिसांनी भाजप अध्यात्मिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांच्यासह जिल्हाध्यक्ष नितीन काळे, नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या 9 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा.. इनकमिंग सुरूच! एकनाथ खडसेंसह 5 माजी आमदारांनी हाती घेतला राष्ट्रवादीचा झेंडा शासकीय आदेशाचे पालन न करणे, कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन करणे या भादंवि कलम 188, 269, 270 नुसार तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे प्रशासन व भाजप अध्यात्मिक आघाडीचे आंदोलक यांच्यात वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर तुळजापूरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील मंदिरं सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीकडून तुळजापुरात कालपासून बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. तरीही हे आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. राज्यातील ठाकरे सरकार कुंभकर्णाप्रमाणे झोपी गेल्याचा आरोप तुषार भोसले यांनी केला आहे. काय म्हणाले तुषार भोसले? साधू-संतांचा आवाज ऐकायला हे सरकार तयार नाही. साधू-संतांशी चर्चा करा म्हणून दोन वेळा पत्र पाठवली. पण हे सरकार झोपी गेल्याचं सोंग आणत आहे, अशी टीका तुषार भोसले यांनी केली. भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटीलही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. राज्य सरकारनं सिनेमागृह, जलतरण तलाव आदींना परवानगी दिली. हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि बार यापूर्वीच सुरु झाले आहेत. अशावेळी राज्यातील मंदिरं बंद का? असा सवाल भाजप, विविध मंदिर समित्या आणि राज्यभरातील साधू-महंतांकडून करण्यात येत आहे. यापूर्वी मंदिरं सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजपनं राज्यभर थाळीनाद आंदोलन केलं होतं. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजून मंदिरं सुरु करण्याची भाजपची मागणी मान्य केलेली नाही. राष्ट्रवादीच्या आमदाराचा तुषार भोसलेंवर हल्लाबोल ‘साधूसंत सरकार पाडतील, साधूसंत म्हणजे नेमके कोण?, ते आंदोलन करणारे भोसले स्वतःला साधूसंत म्हणवून घेत आहेत. मग साधूसंतांची नक्की व्याख्या कोणती?’, असा थेट सवाल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थितीत केला आहे.

जाहिरात

हेही वाचा… यंदाची दिवाळी फटाक्याविना? मुंबईकरांसाठी BMC लवकरच घेणार मोठा निर्णय आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट करून भाजपवर निशाणा साधला आहे. जातीय द्वेष पसरवणं ही साधुसंतांची व्याख्या असते का?, वारकरी समाज हा साधाभोळा समाज आहे. हा वारकरी समाज विठ्ठल सांप्रदायाला प्रमाण मानतो, इथे तुकोबारायांची, ज्ञानेश्वरांची, चोखोबारायांची परंपरा आहे. या महाराष्ट्राला गाडगेबाबांपर्यंतची परंपरा आहे. वारकरी सांप्रदाय जातीय द्वेष शिकवत नाही, असे देखील अमोल मिटकरी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात