मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

'त्या' पक्षांचा कार्यक्रम झाला आता शिंदे गट...; रोहित पवारांचा भाजपला खोचक टोला

'त्या' पक्षांचा कार्यक्रम झाला आता शिंदे गट...; रोहित पवारांचा भाजपला खोचक टोला

 राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी मध्यावधी निवडणूक लागणार का यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Baramati, India
  • Published by:  Ajay Deshpande

बारामती, 22 जानेवारी : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराने बंडखोरी केली यापेक्षाही भाजपला उमेदवार मिळाला नाही, यावरून भाजपची ताकद कमी झाली हे स्पष्ट होत असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.  भाजपने ज्या ज्या ठिकाणी एमएलसीचे उमेदवार दिले आहेत, त्यामध्ये शिंदे गटाला कुठेही न्याय मिळाला नाही. याचाच अर्थ असा आहे की कोर्टाचा निकाल शिंदे सरकारच्या विरोधात जाईल याची खात्री भाजपाला असल्यानं, शिंदे गटाला डावलले जात आहे का? असा प्रश्न निर्माण होत असल्याचंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

शिंदे गटाची ताकद कमी करण्याचा प्रयत्न  

पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, यापूर्वी अनेकांनी मान्य केले आहे की, जे जे पक्ष आणि लोक भाजपसोबत जातात त्यांचा टप्प्याटप्प्याने कार्यक्रम होतोच. सध्या शिंदे गटाची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मध्यावधी निवडणुका लागल्याच पाहिजेत म्हणजे लोकांना पक्षांची खरी ताकद कळेल. हे सरकार बदला घेण्यासाठी तयार झालेलं सरकार आहे. बदला घेण्यासाठी जे सरकार स्थापन होत असते त्यात व्यक्तीगत हीत जास्त असते. जिथे व्यक्तीगत हीत अधिक असते ते सरकार लवकर पडत नाही. त्यामुळे मध्यावधी निवडणुका लागतील असं वाटत नसल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

'मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच'   

मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाची पिछेहाट होतेय, असा सर्व्हे रिपोर्ट आहे. त्यामुळे निवडणुका लांबणीवर टाकल्या जात आहेत. मोदींनी घेतलेली सभा पाहता पुढच्या काही महिन्यांत मुंबई महापालिकेची निवडणूक लागेल असं दिसत असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.

First published:

Tags: BJP, NCP, Rohit pawar