जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / शरद पवारांवरील वक्तव्यानंतर राष्ट्रवादीकडून राज ठाकरेंवर पलटवार

शरद पवारांवरील वक्तव्यानंतर राष्ट्रवादीकडून राज ठाकरेंवर पलटवार

'राज ठाकरे यांना प्रसिद्धीची हौस आहे. शरद पवार हे शक्तीस्थळ आहे. शक्तीस्थळावर हल्ला करायचा ही पद्धत झाली आहे'

'राज ठाकरे यांना प्रसिद्धीची हौस आहे. शरद पवार हे शक्तीस्थळ आहे. शक्तीस्थळावर हल्ला करायचा ही पद्धत झाली आहे'

‘राज ठाकरे यांना प्रसिद्धीची हौस आहे. शरद पवार हे शक्तीस्थळ आहे. शक्तीस्थळावर हल्ला करायचा ही पद्धत झाली आहे’

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 20 ऑगस्ट : मनसेचे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) यांना प्रसिद्धीची हौस आहे, त्यामुळे ते अशी वक्तव्य करत असतात, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते अकुंश काकडे (ankush kakade) यांनी लगावला. प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकांवरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सल्ला का दिला ते समजावून सांगावे, असा टोला लगावला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीकडून प्रतिउत्तर देण्यात आलं आहे. ‘शरद पवारांनी कधीही जाती पातीचे राजकारण केले नाही.  मराठा समाजाबद्दलही राजकारण केलं नाही. कायम वंचित घटकांना बरोबर घेतलं.  इतर जातींना सोबत घेतलं. छगन भुजबळ हे त्याचे उदाहरण आहे. अनेक असे नेते राष्ट्रवादीत मोठे झाले आहे, असं अंकुश काकडे म्हणाले. ‘8वर्षापूर्वी मृत्यू झाला होता,आता पुनर्जन्म’,आई-वडिलांना शोधत मुलगा घरी पोहोचला तसंच, ‘राज ठाकरे यांना प्रसिद्धीची हौस आहे. शरद पवार हे शक्तीस्थळ आहे. शक्तीस्थळावर हल्ला करायचा ही पद्धत झाली आहे. त्यामुळे आपल्याला आपोआप प्रसिद्ध मिळते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आणि त्यांची भाऊ बंदकी आहे’ असा टोलाही काकडे यांनी लगावला. ‘राज्यात जातीयवादी सरकार येऊ नये म्हणून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांना एकत्र घेऊन सरकार स्थापन केलं आहे. महाविकास आघाडी सरकारला संपूर्ण राज्यातील जनतेनं स्विकारलं आहे. मुळात राज ठाकरे हे मुंबईत एक, नाशिकमध्ये दुसरंच बोलतात, असा टोलाही काकडेंनी लगावला. काय म्हणाले राज ठाकरे? मी एका कार्यक्रमात जातीपातीच्या विषयाबद्दल विधान केलं होतं. पण, माझ्या विधानाचा आणि माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या विधानाचा काय संबंध होता. मी प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तकंही वाचली आहे आणि यशवंतराव चव्हाण यांची पुस्तकं सुद्धा वाचली आहे. मी जे काही बोललो त्याचा माझ्या आजोबांच्या पुस्तकांचा काय संबंध होता हे शरद पवार यांनी समजून सांगावे, अशी विनंतीच राज ठाकरे केली आहे. OYO मध्ये 300 जागांची भरती, कंपनीला हवेत नव्या दमाचे ‘टेक प्रोफेशनल्स’ तसंच,  राज्यात जातीयवाद हा आताच नाही. ९९ च्या सालात जातीपाती होत्या. पण, त्यानंतर द्वेष हा आणखी वाढला. किंबहुना राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जातीपातीमध्ये द्वेष आणखी वाढला आहे.  प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान होता, त्यामुळे जातीपुरते मतदान होत होते. पण, दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण होणे हे राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर झालं. हे सर्व राजकीय पक्षांना माहिती आहे, पण बोललो फक्त मीच, असंही राज ठाकरे म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात