मुंबई, 20 ऑगस्ट : देशातील महत्त्वाची हॉस्पिटॅलिटी फर्म (hospitality firm) असणाऱ्या ओयो (OYO) कंपनीत जवळपास 300 जागा (300 recruitments) नव्याने भरल्या जाणार असून टेक प्रोफेशनल्ससाठी (tech professionals) ही मोठी संधी असणार आहे. पुढील सहा महिन्यात या जागा भरल्या जाणार असून त्यात एन्ट्री लेव्हलपासून सिनीअर लिडरशीपच्या पातळीपर्यंत सर्व मिळून 300 नव्या कर्मचाऱ्यांना सामावून घेतलं जाणार आहे.
या क्षेत्रातील तंत्रज्ञांची गरज
OYO कंपनीकडून बुधवारी देण्यात आलेल्या माहितीनुसार मशिन लर्निंग, डेटा इंजिनिअरिंग आणि इन्फर्मेशन सिक्युरिटी, अँड्राइड आणि IOS डेव्हलपर्स या क्षेत्रातील कुशल आणि अनुभवी कर्मचाऱ्यांच्या शोधात आहे.
ग्राहकांना अधिक चांगला अनुभव
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना अधिक चांगल्या दर्जाचा अनुभव देण्यासाठी तंत्रज्ञानाच्या पातळीवर काही नवे प्रयोग करण्याचा कंपनीचा विचार असून त्यावर गुंतवणूक वाढवण्याच्या दिशेनं कंपनीची पावलं पडत आहेत. छोट्या आणि मध्यम आकाराची हॉटेल्स आणि घरं या ठिकाणी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उत्तम वापर करण्याचं कंपनीचं नियोजन असून त्यासाठी या तंत्रज्ञांची मदत कंपनी घेणार आहे.
हे वाचा -पाया पक्का केला तर, रँक निश्चित; IAS प्रेरणा सिंग यांचा ‘स्मार्ट स्टडी’चा फंडा
कॅम्पस प्लेसमेंट सुरू
कंपनीनं कँपस लेव्हल प्लेसमेंटला सुरुवात केली असून आतापर्यंत 50 हून अधिक मिड-लेव्हल प्रोफेशन्सना नोकरीवर घेण्यात आलं आहे. याशिवाय देशभरातील विविध विद्यापीठांमधून 150 नव्या तरुणांना नोकरीवर घेतलं जाणार आहे. कंपनीकडे टेक्निकल क्षेत्रातील टँलेंट मोठ्या प्रमाणावर असून प्रत्येकजण एक अनोखी कल्पना घेऊन समोर येत असल्याचं ओयोचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर अंकित मधुरिया यांनी म्हटलं आहे. यामुळे कंपनीच्या सेवेचा दर्जा वाढणार असून भविष्यात जगातील नंबर 1 ची कंपनी होण्याचं स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.