पवारांच्या नाराजीनंतर ठाकरे सरकारचं एक पाऊल मागे, मुंबईत 2 किमी परिघातच प्रवासाची अट रद्द

घरापासून दोन किलोमीटर परिघातच प्रवास मुभा देण्यात यावी असं मुंबई पोलिसांचं म्हणणं होतं.

घरापासून दोन किलोमीटर परिघातच प्रवास मुभा देण्यात यावी असं मुंबई पोलिसांचं म्हणणं होतं.

  • Share this:
    मुंबई, 04 जुलै : राज्यात कारोनाचा कहर वाढत असताना मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे घरापासून दोन किलोमीटर परिघातच प्रवास मुभा देण्यात यावी असं मुंबई पोलिसांचं म्हणणं होतं. पण यावर नागरिकांकडून तीव्र विरोध झाल्यानंतर राज्य सरकारने ही अट मागे घेतली तर घराजवळच खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. याबद्दल पोलिसांनी सूचना देण्यात आल्या आहेत. दोन किलोमीटर अंतरातच मुंबईकरांनी प्रवास करावा या मुंबई पोलिसांच्या आदेशावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ती तीव्र नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे आक्षेप घेतला. एकंदरीतच नागरिकांचा विरोध आणि राजकीय नेत्यांची नाराजी पाहता पोलिसांनी ही अट रद्द करून घराजवळच खरेदी करण्याचा नियम जारी केला असं वृत्त लोकसत्तामध्ये देण्यात आलं आले. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस आयुक्तांनी दोन किलोमीटर परिघाचा परिघातच प्रवास मुभा हा नियम रद्द करून घराजवळच खरेदी करा असं आवाहन नागरिकांना केलं आहे. खरंतर, गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहेत. त्यात लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर मुंबईत येणाऱ्यांची संख्याही वाढली होती. त्यामुळे रविवार आणि सोमवारी पोलिसांनी मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहनांची धरपकड केली. ...तर हेल्दी राहण्यासाठी तुम्ही खात असलेले काजू तुमच्यासाठी हानीकारक ठरतील कोणालाही विनाकारण पकडू नये यावर शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर हा नियम बदलण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दररोज नवे विक्रम करत आहे. या धक्क्यांनी राज्य हादरुन गेले आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 6364 रुग्ण आढळून आलेत. ही आत्तापर्यंतची सर्वात जास्त संख्या आहे. त्यामुळे राज्यातल्या रुग्णांचा एकूण आकडा हा 1,92,990 वर गेला आहे. तर आज 198 मृत्यूची नोंद झाली. यातले 150 मृत्यू हे गेल्या 48 तासांमधले असून 48 हे त्या आधीचे आहेत. त्यामुळे मृत्यूची एकूण संख्या ही 8376 वर गेली आहे. मुंबईत काल 1338 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे मुंबईतली संख्या 82,074वर गेली आहे. तर 73 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूचा आकडा 4762 वर गेला आहे. संपादन - रेणुका धायबर
    First published: