जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / हॉस्पिटलमध्ये झाला बाळाचा मृत्यू, बापाने केले आंदोलन की, लोकांचे डोळे पाणावले

हॉस्पिटलमध्ये झाला बाळाचा मृत्यू, बापाने केले आंदोलन की, लोकांचे डोळे पाणावले

हॉस्पिटलमध्ये झाला बाळाचा मृत्यू, बापाने केले आंदोलन की, लोकांचे डोळे पाणावले

एवढेच नव्हे तर महिलेच्या गर्भपिशवीत हात घालून बाळाची ओढताण करीत बाळाला बाहेर काढले त्यात बाळाचा मृत्यू झाला

  • -MIN READ
  • Last Updated :

बुलडाणा, 25 जुलै : प्रसूतीकळा नसताना सुद्धा एका डॉक्टरने जबरदस्ती महिलेची प्रसूती केली त्यात बाळाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे घडली होती. पण, पोलिसात तक्रार करूनही कारवाई झाली नाही म्हणून तक्रारकर्त्या इसमाने उपविभागीय कार्यालयातील खांब्याला स्वतःला बांधून घेऊन हॅन्ड लॉक करून आमरण  उपोषण आंदोलन केले. अखेर प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव या गावचा रहिवाशी शारदा संजय भोंगाळे या महिलेची जळगाव जामोद येथील समाधान हॉस्पिटलमध्ये डॉ.अविनाश पाटील यांनी प्रसूती अतिशय क्रूरपने केल्याने सुदृढ असलेला बाळ प्रसूती करीत असतानाच दगावले, असा आरोप  संजय भोंगाळे केला. तसंच या हॉस्पिटल आणि डॉक्टरावर कारवाई व्हावी यासाठी सर्च स्तरावर तक्रारी केल्या. मात्र, महिना उलटला तरी कारवाई न झाल्याने शुक्रवारपासून संजय भोंगाळे यांनी उपविभागीय कार्यालयातील खांब्याला स्वतःला बांधून घेऊन हॅन्ड लॉक आमरण उपोषण आंदोलनास सुरुवात केली होती. या आंदोलनाने प्रशासनात एकच खळबळ उडाली. त्यानंतर आंदोलनाची दखल घेऊन रात्री लेखी आश्वसनाचे पत्र देण्यात आले. त्यानंतर संजय भोंगाळे यांनी आंदोलन मागे घेतले. पवारांच्या राम मंदिराबद्दल वक्तव्याबद्दल उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बोलले,म्हणाले.. जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथील शारदा भोंगळे या महिलेचे प्रसूती संदर्भात उपचार जळगाव जामोद येथील डॉ. महिला उज्वला पाटील यांच्याकडे सुरू होता. उज्वला पाटील ह्या शासकीय सेवेत असून त्या तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मात्र, डॉ. उज्वला पाटील यांचे पती डॉ.अविनाश पाटील यांनी पेशंट शारदा हिला स्वतः च्या क्लिनिक्समध्ये नेऊन तिला प्रसूती कळा येत नसताना तिची प्रसूती जबरदस्तीने केली. एवढेच नव्हे तर महिलेच्या गर्भपिशवीत हात घालून बाळाची ओढताण करीत बाळाला बाहेर काढले त्यात बाळाचा मृत्यू झाला. अंगावर काटा आणणारा आणि धक्कादायक प्रकार डॉ अविनाश पाटील यांनी केला, असे स्वतः पीड़ित महिलेने आपबीतीचे कथन केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात